नागपूर- लॉकडाऊनमुळे नागपूर जिल्ह्यासह विभागात वेगवेगळ्या ठिकाणी तसेच निवारागृहात १,६०० नागरिक अडकले होते. या सर्व नागरिकांना आज नागपूर ते दरभंगा विशेष श्रमिक ट्रेनने बिहारकडे रवाना करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रशासनाकडून प्रवासासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली व सोशल डिस्टन्सिंगचे पालनही करण्यात आले.
दरभंगासाठी निघालेल्या श्रमिक स्पेशल रेल्वेमध्ये भंडाऱ्यातील ७८, गोंदियातील २, गडचिरोलीतील १०५, चंद्रपूर जिल्ह्यातील २६१, काटोल येथील ३, कळमेश्वर येथील ८१, नागपूर ग्रामीणमधील १८३ व नागपूर शहरातील ८८७ अशा एकूण १,६०० नागरिकांचा समावेश आहे. रेल्वे स्थानकावर सर्व प्रवाशांची आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात आली. रेल्वेमध्ये पाठवण्यात येणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित अंतर पाळणे बंधनकारक करण्यात आले होते. ही रेल्वे पूर्णपणे सॅनिटाईज करण्यात आली असून प्रत्येक प्रवाशाने चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल घातला असल्याची खात्री करून घेण्यात आली. तसेच प्रवाशांच्या जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती.
हेही वाचा- नागपूर परिसरात अडकलेल्या ११२२ मजुरांना घेऊन श्रमिक स्पेशल रेल्वे उत्तर प्रदेशला रवाना