ETV Bharat / state

प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींशीही बोलेन; विदर्भातील पीक नुकसानीच्या पाहणीनंतर पवारांचे आश्वासन - नागपूर news

राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. राज्यातील शेतकऱ्यांसाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही बोलेन, असे पवार यावेळी म्हणाले.

यासाठी नरेंद्र मोदींशी बोलणार शरद पवार
author img

By

Published : Nov 15, 2019, 4:59 PM IST

नागपूर - राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. राज्यातील शेतकऱ्यांसाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही बोलेन, असे पवार यावेळी म्हणाले. पवारांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून झालेल्या नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पवारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यासाठी नरेंद्र मोदींशी बोलणार शरद पवार

हेही वाचा - देवेंद्र फडणवीसांच्या 'मी पुन्हा येईन' वर शरद पवारांची टोलेबाजी

पवार म्हणाले की, गेले काही दिवस निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतीवर आलेल्या संकटाबद्दल माहिती मिळत होती. म्हणून तातडीने यावे असे वाटत होते. मात्र, तेव्हा राज्यात राजकीय घडामोडी घडत असल्याने मला तातडीने येता आले नाही. काल अवकाळी पावसाने झालेली शेतीची स्थिती पाहिली. अवकाळीच्या या संकटाने सर्व महत्त्वाच्या पिकांवर परिणाम झाला आहे. संत्रा, मोसंबी, धान, कापूस, सोयाबीन, ज्वारी अशा सर्व पिकांवर याचा परिणाम झाला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे पवार म्हणाले. अवकाळी पावसामुळे नागपूरसह विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. संत्र्याचा संपूर्ण बहर वाया गेला आहे.

हेही वाचा - सरकार आम्हीच स्थापन करणार, अन्.. ५ वर्षे चालवण्यासाठी प्रयत्नही करणार - शरद पवार

झाडावरची ७० टक्के फळे गळून पडली आहेत. फळ तोडण्याचा खर्च भरून निघणार नाही अशी स्थिती आहे. संत्र्यांवर डायबॅक रोगाचा प्रादुर्भाव असून संत्रा उत्पादक प्रचंड संकटात आहे. या शेतकऱ्यांना आर्थिक मदत कशी देता येईल, या बाबतीत वेगळा विचार करावा लागणार असल्याचे पवार म्हणाले. त्याचबरोबर धान (भात) आणि कापूस शेतकरी ही संकटात आहे. कापूस कोणी खरेदी करणार नाही, अशा स्थितीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी मी केंद्रीय अर्थ मंत्रालाय आणि कृषी मंत्रालयाशी संपर्क करणार असल्याचे ते म्हणाले. तसेच यासंदर्भात मला नरेंद्र मोदी यांच्याशी जरी बोलावे लागले तर त्यांच्याशीही बोलेन असे म्हणाले.

Intro:गेले काही दिवस अनेकांकडून निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतीवर आलेले संकट या बद्दल माहिती मिळत होती म्हणून तातडीने यावं असे वाटत होते मात्र तेव्हा राज्यात राजकीय घडामोडी घडत असल्याने मला तातडी ने येता आले नाही...काल स्थिती पहिली - सर्व महत्वाच्या पिकांवर परिणाम झाले आहे.. संत्रा मोसंबी धान कापूस सोयाबीन ज्वारी सर्व पिकांवर विपरीत परिणाम झाला आहे,हे नुकसान अभूतपूर्व झाल्याचे शरद पवार म्हणाले आहेत Body:पावसामुळे नागपूर सह विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे,संत्र्याचा संपूर्ण बहार वाया गेला आहे...
झाडावरची 70 टक्के फळं गळून पडले आहे..फळ तोडण्याचा खर्च भरून निघणार नाही अशी स्थिती आहे..संत्र्यांवर डायबॅक रोगाचा प्रादुर्भाव असून संत्रा उत्पादक प्रचंड संकटात आहे.. या शेतकऱ्यांना आर्थिक मदत कशी देता येईल या बाबतीत वेगळा विचार करावा लागणार असल्याचे शरद पवार म्हणाले आहेत...एवढच काय तर धान आणि कापूस शेतकरी ही संकटात आहे..कापूस कोणी खरेदी करणार नाही अशा स्थितीत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी या करिता केंद्रिय अर्थमंत्रालाय आणि कृषी मंत्रालयाशी संपर्क करणार असल्याचे ते म्हणाले आहेत
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.