ETV Bharat / state

शिवस्मारकाची घोषणा झाली मात्र इंचभरही बांधकाम नाही - शरद पावार - शरद पवार यांनी सरकारवर हल्ला चढवला

शिवस्मारकाची घोषणा झाली, मात्र इंचभरही बांधकाम झाले नाही.. 'महाराष्ट्राची उपराजधानी असलेले नागपूर हे आता गुन्हेगारांसाठी राजधानी' बनत आहे, असे बोलत शरद पवार यांनी सरकारवर हल्ला चढवला आहे.

शरद पवार
author img

By

Published : Oct 10, 2019, 5:50 PM IST

नागपूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे गुरूवारी राष्ट्रवादीचे उमेदवार विजय घोडमारे यांच्या प्रचारार्थ आयोजीत सभेसाठी हिंगणा येथे आले होते. यावेळी त्यांनी बोलताना राज्यातील युती सरकार आणि मुख्यमंत्री यांच्यावर जोरदार टीका केला.

शरद पवार यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे ;

  • महाराष्ट्राची उपराजधानी असलेले नागपूर शहर हे सध्या गुन्हेगारांचे शहर म्हणून ओळखले जात आहे. नागपूरचा गुन्हेगारांची राजधानी म्हणून होत असलेला उल्ले यात आपल्या सर्वांचीच बदनामी आहे.
  • राज्यातील सरकार हे शिवाजी महाराजांच्या नावाने राज्यकारभार करत असल्याचे बोलत आहे. या सरकारने शिवस्मारकाची घोषणा केली. पंतप्रधानांच्या हाताने जलपूजन केले. मात्र पाच वर्षांत सरकार एक इंचही बांधकाम करू शकले नाही.
  • शिवस्मारकाप्रमाणेच सरकारने इंदू मील येथील बाबासाहेबांच्या स्मारकाबाबत देखील जनतेची फसवणूक केली, असा उल्लेख पवारांनी आपल्या सभेत केला आहे.
  • भाजप सरकारचे काम म्हणजे, बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी असे आहे. या सरकारचा सगळा भार हा फक्त घोषणा करण्यावर आहे.
  • केंद्रातील नेते राज्यात प्रचारासाठी येतात आणि कलम 370, काश्मीर यावर बोलतात. हे विषय महत्वाचे असले तरी त्यांचा राज्याशी संबंध नाही, यामुळे त्यांनी येथील समस्यांवर बोलायला हवे.
    sharad pawar
    शरद पावार

हेही वाचा... पवारांचे नाव येताच ईडीला घाम फुटला- खा. कोल्हे

पवारांचे काश्मीर प्रश्नावर स्पष्टीकरण

मोदी आणि शहा सातत्याने पवारांचा उल्लेख 370 ला विरोध केला याबद्दल घेत असल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना पावार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी आपला निर्णय 370 हटवण्याला नसून त्याच्या प्रक्रियेला आहे. म्हणजेच काश्मीरच्या जनतेला विश्वासात घेऊन निर्णय घ्यायला हवा होता, असे सांगितले आहे.

राज्यातील समस्यांची सरकारला करून दिली आठवण

राज्यात मागील पाच वर्षात 16000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, या सरकारने प्रचारात त्या मुद्द्यावर बोलायला हवे, असे पवार यावेळी म्हणाले.
हे सरकार काम न करता लोकांची फक्त फसवणूक करत आहे. त्यामुळे येत्या निवडणूकीतून लोकांनी मतदानातून या सरकारला धडा शिकवला पाहिजे, असे आव्हान पवारांनी यावेळी केले आहे.

हेही वाचा... मुख्यमंत्री हे मैदानातून पळ काढलेले पैलवान - विजय वडेट्टीवार

शरद पवारांनी मंदीवर केले भाष्य

एकीकडे मंदी तर एकीकडे महागाई अशा दुहेरी कात्रीत आज महाराष्ट्रातील नागरिक सापडले आहे. राज्यात कारखानदारी वाढावी यासाठी आम्ही प्रयत्न केले, मात्र या सरकारच्या काळात राज्यातील कारखाने बंद पडत आहेत, ही मोठी समस्या असल्याचे पवार यावेळी म्हणाले.

सरकार सरकारी यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा केला आरोप

राज्यातील सरकार आणि केंद्र सरकार सरकार सरकारी यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप शरद पवार यांनी यावेळी केला. यामुळे आता राज्य बदलायचं आहे आणि राज्यात परिवर्तन करायच आहे. सर्वांच्या जीवनात स्थैर्य आणायचे आहे, यासाठी आघाडीच्या उमेदवाराच्या पारड्यात लोकांनी आपले दान टाकावे असे आव्हान पवारांनी यावेळी जनतेला केले.

Intro:Body:

pawar

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.