ETV Bharat / state

Bawankule On Sharad Pawar: शरद पवार नेहमीच डबल गेम खेळतात, हे साऱ्या राज्याला ठाऊक - बावनकुळे - बावनकुळेंची शरद पवारांवर प्रतिक्रिया

२०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या संमतीनेच अजित पवारांना सोबत घेऊन सरकार स्थापन करण्यात आले होते. या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गौप्यस्फोट केल्यानंतर यावर भाजपचे प्रांताध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, शरद पवार यांच्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की, ते नेहमीच डबल गेम खेळतात.

Bawankule On Sharad Pawar
बावनकुळे
author img

By

Published : Jun 29, 2023, 8:13 PM IST

बावनकुळेंची शरद पवारांवर टीका

नागपूर : शरद पवारांनी त्यांच्या जीवनात अनेक सरकार बसविले आणि पाडले. ते बोलतात वेगळे, करतात वेगळे हे सर्वांनी पाहिले आहे. त्यांचे राजकारण नेहमीच बोलणं एक आणि करणं वेगळं असेच राहिले आहे, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठ्या मनाचे नेते आहेत. छोट्या-मोठ्या जाहिरातीवरून त्यांच्यातील संबंध हे खराब होतील असे ते नाही. ते विचारांनी प्रगल्भ नेते आहे, असे मत बावनकुळे यांनी मांडले.

सरकारचे काम जनतेपर्यंत पोहचले पाहिजे: सरकार काम करत असताना काम चांगल्या पद्धतीने व्हावे, ही भावना त्यामागे आहे. आम्ही राजकीय कार्यकर्ते आहोत. सरकारची कामे जनतेसाठी व्हावे, ही इच्छा असते आणि त्याच इच्छेने फडणवीस बोलले असतील. ओवेसी, शरद पवार आणि बंटी पाटील यांनी मध्यंतरी विशिष्ट समाजाच्या संदर्भात काही वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यांमधून अश्या लोकांना प्रोत्साहन मिळत आहे. सर्वच पक्षांनी याबद्दल काही नियम पाळले पाहिजे. भारतात राहून पाकिस्तानचे गुणगान करणाऱ्या शक्तींना उध्वस्त केले पाहिजे. शिंदे-फडणवीस सरकार अशा शक्तींना शोधून काढेल आणि जमिनीत गाढल्याशिवाय राहणार नाही, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

मविआवरही टीकास्त्र: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारला 9 वर्ष पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोदी @9 हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमअंतर्गत माजी खासदार संजय काकडे यांच्यावतीने 60 हजार पुस्तके वाटण्यात येणार आहेत. या पुस्तकांचे प्रकाशन आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.

नाना पटोले यांनाही टोमणा: राज्यात महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षाच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री पदासाठी दावेदारी केली जात आहे. तिन्ही पक्षांच्या नेते मंडळींचे फोटो, फ्लेक्स देखील लावण्यात येत आहे. यावरुन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे. महाविकास आघाडीमध्ये 10 मुख्यमंत्री आहेत. त्यापैकी काँग्रेसकडे 3 मुख्यमंत्री आहेत. नाना पटोले यांनी तर वारीत फ्लेक्स लावले होते, असे म्हणत बावनकुळेंनी नाना पटोले यांनाही टोमणा मारला.

हेही वाचा:

  1. Sharad Pawar on Devendra Fadnavis : पहाटेच्या शपथविधीवरुन शरद पवारांची गुगली; पवार-फडणवीसांमध्ये वाकयुद्ध, पाहा कोण झाले बोल़्ड
  2. Sharad Pawar criticizes BJP : राज्यात महिला गायब होण्याचे प्रमाण वाढले, पवारांचा घणाघात, मोदींनाही सुनावले खडे बोल
  3. Supriya Sule Birthday : NCP खासदार सुप्रिया सुळेंचा वाढदिवस; जाणून घ्या, थक्क करणारा जीवनप्रवास

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.