नागपूर - शहर पोलीस दलात कार्यरत असलेले लकडजंग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे यांना 2020 सालचा केंद्रीय गृहमंत्री पदक यांना जाहीर झाला आहे. राज्यातील दहा अधिकाऱ्यांना पदक जाहीर झाले असून हिवरे हे विदर्भातील एकमेव अधिकारी आहेत. सर्वोत्कृष्ट तपासाबद्दल त्यांना हे पदक जाहीर झाले आहे.
2019 मध्ये पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे हे नागपूर शहर गुन्हे शाखेत कार्यरत असताना कळमना, कामठी, जरीपटका येथील बॉबी माकन हत्याकांड आणि गणेशपेठ येथील गांधीसागर तलावातील एका व्यक्तीचे सात तुकडे करुन केलेले हत्याकांड अशा चार संवेदनशील खुनाचा तपास करुन गुन्हे उघडकीस आणला होता.
जुलै, 2019 मध्ये गांधीसागर तलावात दोन पोत्यात एका पुरुषाचे सात तुकडे झालेले छिन्न विछिन्न अवस्थेत प्रेत मिळाले होते. त्यावेळी त्या तपासादरम्यान गुन्हे शाखेने जवळपास 500 सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले होते. तसेच मृताचे छिन्न चेहऱ्याचे संगणकाद्वारे छायाचित्र तयार करून संपूर्ण नागपूर शहरात तपास केला. नागपूर शहर व परिसरातील हरवलेल्या व्यक्तींबाबत माहीती घेतली. काही हरवलेल्या लोकांची डि.एन.ए. तपासणी केली. सतत 28 दिवस तपास करुन मृताचे नाव सुधाकर रंगारी, असल्याची ओळख पटवली. त्यानंतर याप्रकरणी आरोपी राहुल पद्माकर भोतमांगे व राहुल ज्ञानेश्वर धापोडकर यांना गुन्ह्यात अटक करुन गुन्ह्यात वापरलेली ई-रिक्षा व मृताचे तुकडे करण्यासाठी वापरलेले कटर जप्त केले होते. या हत्याकांडाचा योग्य तपास करुन गुन्हेगारांना अटक केली होती. राज्यातील सर्वोत्कृष्ट तपास असल्याचा गौरव देखील करण्यात आला होता. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे यांना 2020 सालचा केंद्रीय गृहमंत्री पदक यांना जाहीर झाला आहे.