ETV Bharat / state

गेल्या २४ तासात बिबट्याचा ठावठिकाणा नाही; वन विभागाची शोध मोहीम सुरूच - leopard in nagpur

गेल्या २४ तासांपासून बिबट्याने कुणालाही दर्शन दिलेले नाही. त्यामुळे बिबट नाल्याच्या काठाने पुढे किंवा मागे परत गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बिबट्याला सुरक्षितरित्या पकडण्यासाठी वनविभागाने परिसरात काही कॅमेरे आणि तीन पिंजरे लावले होते. ज्यामध्ये बिबट्याला जेरबंद करणासाठी शिकार देखील ठेवण्यात आली होती. मात्र बिबट पिंजऱ्याकडे फिरकला देखील नाही.

गेल्या २४ तासात बिबट्याचा ठावठिकाणा नाही; वन विभागाची शोध मोहिम सुरूच

author img

By

Published : Jun 2, 2021, 5:52 PM IST

नागपूर - मागील दोन दिवसांपासून नागपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या महाराजबाग प्राणी संग्रहालयाच्या मागच्या भागात असलेल्या कृषी विभागाच्या परिसरात बिबट्याचा वावर आढळून आला होता. मात्र गेल्या २४ तासांपासून बिबट्याने कुणालाही दर्शन दिलेले नाही. त्यामुळे बिबट नाल्याच्या काठाने पुढे किंवा मागे परत गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बिबट्याला सुरक्षितरित्या पकडण्यासाठी वनविभागाने परिसरात काही कॅमेरे आणि तीन पिंजरे लावले होते. ज्यामध्ये बिबट्याला जेरबंद करणासाठी शिकार देखील ठेवण्यात आली होती. मात्र बिबट पिंजऱ्याकडे फिरकला देखील नाही. पिंजऱ्यात ठेवण्यात आलेली शिकार देखील सुरक्षित आढळून आली आहे. त्यामुळे बिबट कुठे गेला असावा याचा शोध वनविभागाकडून घेतला जात आहे. हा बिबट नागरी वस्तीत शिरल्यास मोठा अनर्थ होण्याची शक्यता असल्याने वनविभागाकडून या भागात दिवसरात्र पहारा देखील ठेवला जात आहे

पाच दिवसांपासून बिबट वन विभागाला हुलकावणी देत आहे
गेल्या पाच दिवसांपासून बिबट वन विभागाला हुलकावणी देत आहे. वन विभागाकडून अहोरात्र या बिबट्याचा शोध घेतला जातो आहे. मात्र तो वारंवार आपला ठावठिकाणा बदलत असल्याने त्याला जेरबंद करणे अवघड होऊन बसले आहे. या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाकडून परिसरात सात कॅमेरे ट्रॅप लावण्यात आली आहे. शिवाय 3 पिंजरे देखील विविध ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. मात्र गेल्या चोवीस तासात या बिबट्याची कोणतीही हालचाल कॅमेरामध्ये कैद झालेली नाही. त्यामुळे वनविभागाचकडून पुढे काय करावं, या संदर्भात चाचपणी केली जात आहे.

गायत्री नगर ते महाराजबाग असा बिबट्याचा प्रवास
पहिल्यांदा बिबट हा गायत्री नगर परिसरात दिसून आला होता. त्या ठिकाणी दोन दिवस शोध घेतल्यानंतर सोमवारपासून त्याचे लोकेशन हे महाराज बाग प्राणीसंग्रालय यामागील नाल्याच्या परिसरात असल्याचं दिसून येत आहे. हा नाला पुढे नाग नदीला जाऊन मिळतो. त्यामुळे हा नाग नदीचाच भाग असल्याचा भाग म्हणून ओळखला जातो. गायत्री नगर ते महाराजबागपर्यंत बिबट नाल्याच्या काठाने प्रवास करत आला असावा, असा कयास वनविभागाने लावलेला आहे. मात्र पुढे हा नाला नाग नदीला जाऊन मिळतो आणि पुढे ही नाग नदी दाट नागरी वस्ती असलेल्या भागातून जातो. त्यामुळे भविष्यात या बिबटमुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता देखील नाकारता येत नाही. या नदी आणि नाल्याचे क्षेत्रफळ सुमारे २० ते २५ किलोमीटरचे आहे. त्यामुळे या बिबट्याला त्याच ठिकाणी रोखुन त्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न वनविभागाकडून केला जातोय. मात्र अद्यापही या मोहिमेला यश मिळाले नसल्याने नागरिकांची धाकधूक मात्र नक्कीच वाढलेली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.