ETV Bharat / state

संकटात संकट : कोरोना काळात फी न भरणाऱ्या मुलांना शाळेने दिला टीसी - नागपुरात शाळेची फी (शुल्क) न भरल्यामुळे मुलांना दिला टीसी

शाळेची फी (शुल्क) न भरल्यामुळे मुलांना शाळेतून काढल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पालकांनी शिक्षण उपसंचालक कक्षातच ठिय्या आंदोलन सुरू केले. जोपर्यंत अधिकारी येऊन तोडगा काढणार नाही तोपर्यंत आम्ही घरी जाणार नाही असा पवित्रा पालकांनी घेतला होता. मोठ्या संख्येने पालक उपसंचालक कार्यालयात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

school sent TC to children non payment fees in nagpur
नागपुरात शाळेची फी (शुल्क) न भरल्यामुळे मुलांना दिला टीसी
author img

By

Published : Jun 4, 2021, 2:21 PM IST

नागपूर - येथील खासगी शाळांची मुजोरी पुन्हा एकदा बघायला मिळत आहे. शहरातील काही शाळांनी पालकांनी कोरोना काळात शाळेची फी (शुल्क) न भरल्यामुळे मुलांना शाळेतून काढल्याची घटना घडली आहे. या शाळांनी चक्क पालकांना त्याच्या पाल्यांचे लिविंग सर्टिफिकेट (टीसी) पाठवली आहे, ज्यामुळे संतापलेल्या पालकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयात जाऊन ठिय्या आंदोलन केले आहे.

नागपुरात शाळेची फी (शुल्क) न भरल्यामुळे मुलांना दिला टीसी

यासंदर्भात पालक संघटनांनी शिक्षणाधिकारी यांना या प्रकरणातील तोडगा काढण्याची विनंती केली. त्यानुसार शिक्षण उपसंचालक कार्यालयात बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती समजताच पालकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयात गर्दी केली होती, मात्र शिक्षण उपसंचालक डॉक्टर वैशाली जामदार आणि शिक्षण अधिकारी चिंतामण वंजारी हे दोघेही उपस्थित नसल्याने पालक संतप्त झाले.

पालक संतप्त -

पालकांनी शिक्षण उपसंचालक कक्षातच ठिय्या आंदोलन सुरू केले. जोपर्यंत अधिकारी येऊन तोडगा काढणार नाही तोपर्यंत आम्ही घरी जाणार नाही असा पवित्रा पालकांनी घेतला होता. मोठ्या संख्येने पालक उपसंचालक कार्यालयात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. यासंदर्भात पालकांचा आणि शिक्षण अधिकाऱ्यांचा दूरध्वनीवर संपर्क झाला असता शिक्षणाधिकाऱ्यांनी असे कुठलीही बैठक मी बोलावले नाही असे स्पष्ट केले. त्यामुळे पालक आणखी संतप्त झाले.

पालकांचा तीन तास ठिय्या -

संतप्त पालकांनी तब्बल तीन तास शिक्षण उपसंचालक कार्यालयात जाऊन ठिय्या आंदोलन केले. यावेळी पालकांनी शाळांच्या मनमानी कारभाराविरोधात तीन तास निदर्शने केले. त्यानंतर शिक्षण उपसंचालक डॉक्टर वैशाली जामदार या कार्यालयात आल्या, त्यांनी पालकांची समजूत काढली आणि या समस्येवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर पालकांनी आपले आंदोलन मागे घेतले.

हेही वाचा - क्राईम कॅपिटल बिबट्याच्या दहशतीने भयभीत, कुत्रा आणि बोक्यात दिसू लागला बिबट्या

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.