ETV Bharat / state

नागपुरात 14 मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालय बंद

author img

By

Published : Mar 6, 2021, 2:39 AM IST

नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहाता, विविध सेवेसह शाळा महाविद्यलय बंद ठेवण्याच्या आदेशाला 14 मार्चपर्यंत मुद्दतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी 7 मार्चपर्यंत सर्व सेवा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते, मात्र आता त्याला पुन्हा एकदा एका आठवड्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.

नागपूरमध्ये दोन दिवसांचा लॉकडाऊन
नागपूरमध्ये दोन दिवसांचा लॉकडाऊन

नागपूर - नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहाता, विविध सेवेसह शाळा महाविद्यलय बंद ठेवण्याच्या आदेशाला 14 मार्चपर्यंत मुद्दतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी 7 मार्चपर्यंत सर्व सेवा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते, मात्र आता त्याला पुन्हा एकदा एका आठवड्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे 14 मार्चपर्यंत आस्थापना बंद असणार आहेत. तसेच शनिवारी आणि रविवारी बाजारपेठ पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी दिले आहेत.

नागपूर शहरात मागील तीन आठवड्यांपासून रुग्णसंख्येत वाढ होत चालली आहे. यात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवताना तसेच खबरदारी म्हणून शाळा महाविद्यालय बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच आठवडी बाजार आणि शनिवार रविवार दोन दिवस शहरातील संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश मनपा आयुक्तांनी दिले होते. यासह लग्न सोहळा, धामिर्क, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रमांवर निर्बध लादण्यात आले आहेत. या कार्यक्रमांवरील निर्बंध सुद्धा आता पुढील 14 मार्चपर्यंत वाढवण्यात आले आहेत. याकाळात नियमाचा भंग केल्यास कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

नागपूरमध्ये दोन दिवसांचा लॉकडाऊन

शाळा महाविद्यालय बंद, वाचनालय असणार सुरू

यात शाळा महाविद्यालय, विद्यापीठ तसेच तस्सम संस्था बंद असणार आहेत. शासन स्तरावरील पूर्वनियोजित परीक्षा कोविड नियमाचे पालन करून घेता येतील असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय वाचनालय मात्र क्षमतेपेक्षा 50 टक्के मर्यादा ठेवत सुरू राहणार असल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. सुरवातीला काही दिवस वाचनालये देखील बंद ठेवण्यात आले होते.

हॉटेल रेस्टॉरंटसाठी असणार हे नियम

हॉटेल रेस्टॉरंटमध्ये रात्री 9 पर्यंत डायनिंग सुविधा असणार आहे. त्यानंतर 11 पर्यंत पार्सल सुविधेला सूट देण्यात आली आहे. मात्र शनिवार आणि रविवार असे दोन दिवस सर्व हॉटेल्स बंद राहणार आहेत. मात्र पार्सल सुविधेला मुभा देण्यात आली आहे. मागील आठवड्यात मांसाहार, मच्छी बाजार बंद होते या आठवड्यात सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

काय सूरु असेल विकेंडला?

शनिवार आणि रविवार असे दोन दिवस नागपूरमधील सर्व अस्थापने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र यातून अत्यावश्यक सेवा ज्यामध्ये वैदकीय सेवा, दूध भाजीपाला, फळे, वृत्तपत्र, पेट्रोल पंप, गॅस, वाहतूक सेवा, एकट्या स्वरूपात असणारे किराणा दुकान, मांस विक्री, वाहन दुरुस्ती, पशुखाद्य विक्री, बँक आणि पोस्ट सेवा यांना सूट देण्यात आली आहे.

काय राहणार बंद?

बाजारपेठेतील दुकाने, चित्रपट गृह, सर्व खाजगी कार्यलय, अत्यावश्यक वगळता सरकारी कार्यालय, हॉटेल रेस्टॉरंट डायनिंग सुविधा बंद राहणार आहेत. दरम्यान महापौर दयाशंकर तिवारी यांनी मागील आठवाड्यात केलेल्या सहकार्याबद्दल नागपूरकरांचे आभार मानले आहेत. तसेच कामाशिवाय घराबाहेर निघू नका, कोरोनाच्या नियमांचे पालन करा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.