ETV Bharat / state

Vajramooth Sabha : नागपुरात वज्रमूठ सभा होणारच - संजय राऊत - Mahavikas Aghadi

महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा नागपुरातील दर्शन कॉलनी येथे होणार आहे. मात्र, या सभेला भाजपसह स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून सभा कोणत्यातीही परिस्थितीत होणार असल्याचे ठाम मत त्यांनी व्यक्त केले आहे. ते आज नागपुरात विमानतळावर बोलत होते.

Vajramooth Sabha
Vajramooth Sabha
author img

By

Published : Apr 14, 2023, 6:33 PM IST

Updated : Apr 14, 2023, 7:10 PM IST

नागपूर हा कुणाच गड रविवारी दिसेल - राऊत

नागपूर : नागपूर हा कुणाचा गड आहे हे रविवारी दिसेल. असे अनेक गड याआधी तुटले आहेत. ही सभा होऊ नये यासाठी राज्य सरकार तसेच काही लोकांनी अडचणी निर्माण करण्याचा भरपूर प्रयत्न केला. तुमच्या पोटात सभेबाबत गोळा आलाय. उद्धव ठाकरे 16 तारखेला येत आहेत. महाविकास आघाडीचे सर्व नेते येत आहेत. कुणी विरोध केला तरी काहीच फरक पडणार नाही. वज्रमूठ सभा होणारच असे ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत म्हणले आहेत. ते आजपासून नागपूर दौऱ्यावर आले आहेत. बाळासाहेब ठाकरे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हे सगळे सांगितले आहे. म्हणजे याचा अर्थ एवढाच नाही की राजकारणासाठीच केवळ हिंदुत्वाचा वापर करायचा अशी टीका राऊत यांनी भाजपवर केली आहे.

तर भाजप 150 पुढे जाणार नाही : राहुल गांधी देशातील सर्व प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांना भेटत आहेत. शरद पवार, नीतीश कुमार, तेजस्वी यादव यांना भेटले. ममता बॅनर्जी यांना ते भेटणार असल्याचे मी ऐकले आहे. राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. 2024 पर्यंत संपूर्ण विरोधी पक्ष एका झेंड्याखाली एकत्र आले पाहिजेत. एकास एक उमेदवार दिला तर भाजप 150 आकडा पार करणार नाही असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

चंद्रशेखर बावनकुळेंना टोला : महाराष्ट्रात येण्यापूर्वी राहुल गांधी यांनी वीर सावरकरांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावर माफी मागावी अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की काय करायचे ते आम्ही पाहून घेऊ. वीर सावरकरांचे विचार बावनकुळे यांनी वाचावे. त्यांनी सावरकरांचे विचार आगोदर समजून घ्यावे, तुम्ही कोणते सवरकारांचे विचार आमंलात आणले ते स्वत: पहावे नंतर दुसऱ्यावर टीका करावी असे राऊत म्हणाले.

वेणूगोपाल मातोश्रीवर येणार : राहुल गांधी यांचा अधिकृत दौरा माहीत नाही, मात्र त्यांची उद्धव ठाकरेंसोबत भेट नक्की होईल. सोमवारी के. सी वेणूगोपाल मातोश्रीवर येणार आहे अशी माहिती देखील खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

डर होना चाहिये : सकाळचा भोंगा बंद झाला पाहिजे अशी टीका सत्ताधारी नेत्यांनी केली आहे. यावर बोलताना म्हणाले की, ये डर होना चाहिये. ही आमची भीती आहे. माझ्या भीतीने हे झोपत नाहीत अशी टीका त्यांनी शिंदे तसेच भाजप सरकारवर केली आहे.

हेही वाचा - Chandrashekhar Bawankule On Rahul Gandhi : राहुल गांधींनी सावरकरांची माफी मागावी अन्यथा...; बावनकुळेंनी दिला इशारा

Last Updated : Apr 14, 2023, 7:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.