ETV Bharat / state

नागपूर महापौरपदासाठी भाजपकडून संदीप जोशी - Manisha kothe Deputy Mayor News Nagpur

नागपूर महानगरपालिकेचे नवे महापौर म्हणून संभावतः संदीप जोशी यांचा शपथ विधी होईल. संदीप जोशी हे भाजपचे महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक असून लघू उद्योग विकास महामंडळाचे ते अध्यक्ष आहेत. शिवाय, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणूनही ओळखले जातात. तर, दयाशंकर तिवारी हे देखील भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक असून माजी स्थायी समिती सभापती राहिले आहेत.

उमेदवारी अर्ज दाखल करतावेळीचे दृश्य
author img

By

Published : Nov 18, 2019, 6:46 PM IST

Updated : Nov 18, 2019, 8:30 PM IST

नागपूर- भारतीय जनता पक्षाकडून नागपूर महानगरपालिका महापौरपदासाठी संदीप जोशी आणि दया शंकर तिवारी यांच्या नावाची घोषना करण्यात आली आहे. त्यानंतर लगेचच संदीप जोशी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याचबरोबर उपमहापौर पदाच्या निवडणुकीकरता भाजप नगरसेविका मनीषा कोठे यांनी देखील अर्ज दाखल केला आहे. महापौर पदाचा कार्यकाळ दोन नेत्यांसाठी विभागण्यात आला असून पहिला मान हा संदीप जोशी तर दुसऱ्या टर्मसाठी दयाशंकर तिवारी यांची निवड करण्यात आली आहे. कोण आहेत संदीप जोशी आणि दया शंकर तिवारी यावर एक नजर टाकूया.

माहिती देताना नागपूर महापौर पदाचे उमेदवार संदीप जोशी

नागपूर महानगरपालिकेचे नवे महापौर म्हणून संभावतः संदीप जोशी यांचा शपथ विधी होईल. संदीप जोशी हे भाजपचे महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक असून लघू उद्योग विकास महामंडळाचे ते अध्यक्ष आहेत. शिवाय, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणूनही ते ओळखले जातात. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या मतदार संघात प्रचाराची जबाबदारी संदीप जोशी यांच्यावरच होती. तर दयाशंकर तिवारी हे देखील भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक असून माजी स्थायी समिती सभापती राहिले आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत हिंदी भाषिकांना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून दयाशंकर तिवारी यांनी पश्चिम नागपूर मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीसाठी दावेदारीही केली होती. परंतु पक्षाने त्यांची उमेदवारी नाकारली होती. पक्षामध्ये कुठलीही गटबाजी नसून सर्वच नेत्यांना संधी मिळावी म्हणून सव्वा-सव्वा वर्षाचा कालावधी निश्चित करण्यात आल्याची माहिती संदीप जोशी यांनी दिली.

हिंदी भाषिक मतदारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

विधानसभा निवडणुकीत हिंदी भाषिकांचा फटका भाजपला बसला होता. त्यामुळे पुढील सव्वा वर्षासाठी दयाशंकर तिवारी यांच्या रूपात हिंदी भाषिक महापौर देऊन हिंदी भाषिक मतदारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत भाजपला बसलेला फटका महापालिका निवडणुकीत बसू नये याचीही काळजी भाजपने घेतली आहे. महापौर व उपमहापौर पदासाठी आज भाजपतर्फे अर्ज दाखल करण्यात आला असून २२ नोव्हेंबरला निवडणूक घेण्यात येणार आहे.

हेही वाचा- नागपूर - अमरावती महामार्गवर बर्निंग ट्रकचा थरार

महापालिकेतील पक्षीय बळ-

भाजप - १०६
काँग्रेस - २९
बहुजन समाज पक्ष - १०
शिवसेना - ०२
राष्ट्रवादी- ०१

Intro:भारतीय जनता पक्षाकडून नागपुर महानगरपालिका महापौरपदासाठी संदीप जोशी आणि दया शंकर तिवारी यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर लगेचच संदीप जोशी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला,याच बरोबर उपमहापौर पदाच्या निवडणुकीकरिता भाजप नगरसेविका मनीषा कोठे यांनी देखील अर्ज दाखल केला आहेत...महापौर पदाचा कार्यकाळ दोन नेत्यांसाठी विभागण्यात आला असून पहिला मान हा संदीप जोशी तर दुसऱ्या टर्म साठी दयाशंकर तिवारी यांनी निवड करण्यात आली आहे...कोण आहेत संदीप जोशी आणि दया शंकर तिवारी यावर एक नजर टाकूया
Body:नागपूर महानगर पालिकेचे नवे महापौर म्हणून संभावतः संदीप जोशी यांच्या शपथ विधी होईल...संदीप जोशी हे भाजपचे महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक असून लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत... शिवाय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकट वर्तिय म्हणूनही ओळखले जातात...नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या मतदार संघात प्रचाराची जबाबदारी हि संदीप जोशी यांच्यावरच होती... तर दयाशंकर तिवारी हे देखील भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक असून माजी स्थायी समिती सभापती राहिले आहेत... नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत हिंदी भाषिकांना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून पश्चिम नागपूर मतदार संघातून भाजपच्या उमेदवारीसाठी दावेदारीही केली होती परंतु पक्षाने त्यांची उमेदवारी नाकारली होती... पक्षामध्ये कुठलाही गटबाजी नसून सर्वच नेत्यांना संधी मिळावी म्हणून सव्वा -सव्वा वर्षाचा कालावधी निश्चित करण्यात आल्याची माहिती संदीप जोशी यांनी दिली...
विधानसभा निवडणुकीत हिंदी भाषिकांचा फटका भाजपला बसला होता... त्यामुळे पुढील सव्वा वर्षासाठी दयाशंकर तिवारी यांच्या रूपात हिंदी भाषिक महापौर देऊन हिंदी भाषिक मतदारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे... त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत भाजपला बसलेला फटका महापालिका निवडणुकीत बसू नये याचीही काळजी भाजपने घेतली आहे... महापौर व उपमहापौर पदासाठी आज भाजपतर्फे अर्ज दाखल करण्यात आले असून २२ नोव्हेंबरला निवडणूक घेण्यात येणार आहे.  

बाईट -- संदीप जोशी (महापौर पदाचे उमेदवार)

महापालिकेतील पक्षीय बलाबल -

भाजप -- १०६ 

काँग्रेस -- २९ 

बहुजन समाज पक्ष -- १० 

शिवसेना -- ०२ 

राष्ट्रवादी  -- ०१ 

Conclusion:null
Last Updated : Nov 18, 2019, 8:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.