नागपूर - भाजपचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाग्यात विरोधीपक्ष नेते पद आणि माजी मुख्यमंत्री हे फार काळ नाही, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी केले. ते नागपुरातील जरीपटका येथे साधना सहकारी बँकेच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते.
हेही वाचा - सीएएला घाबरण्याची काहीही गरज नाही, मुख्यमंत्री ठाकरेंचे मोदी भेटीनंतर स्पष्टीकरण
राज्यात भाजपच्या सरकारला जावे लागले आहे. लोकशाहीमध्ये सरकार येण्याची आणि जाण्याची प्रक्रिया सुरुच असते. लोकशाहीला मजबूत ठेवण्याचे काम आम्हाला करायचे आहे. सामान्य लोक या लोकशाहीची शक्ती असल्याचेही भैय्याजी जोशी यांनी सांगितले. भैय्याजी जोशी यांच्या या वक्त्यानंतर राज्यात पुन्हा सत्ता परिवर्तन होईल का? या विषयावर चर्चा रंगण्याची शक्यता आहे.