नागपूर : नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम दिवशी विरोधकांनी जोरदार आक्रमक (Remove governor ) पवित्रा घेत सरकार विरोधात घोषणाबाजी केली. विधानसभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विधानभवनाच्या पायऱ्यांवर राज्यपाल हटवा महाराष्ट्र वाचवा या घोषणांनी विधान भवनाचा परिसर दणाणून सोडला. ( opposition raised loud sloganeering on steps of Vidhan Bhavan )
राज्यपालांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Maharashtra hated Governor Bhagatsinh Koshyari) हे वारंवार महाराष्ट्राचा अपमान करीत आहेत. महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमान करणाऱ्या अशा महाराष्ट्र दृष्टी राज्यपालांना ताबडतोब हटवा अशी मागणी यावेळी केली तसेच सरकारच्या विरोधात आणि भ्रष्टमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत काळ्याफिती लावून निषेधही व्यक्त केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress state president Nana Patole ) विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक आमदारांनी यावेळी सरकार आणि राज्यपालांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
आक्षेपार्ह वक्तव्य करुन सतत चर्चेत : राज्यपाल हे पद संविधानिक आहे. या पदावरील व्यक्तीने मोजून मापून बोलावे, असे बोलले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बेताल वक्तव्य करण्याचा नवा विक्रम मोडला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महापुरुषांबाबत सतत वादग्रस्त विधाने केली. राज्यात तीव्र पडसाद उमटले. तसेच आक्षेपार्ह वक्तव्य करुन सतत चर्चेत राहणाऱ्या राज्यपालांची तात्काळ उचलबांगडी करावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे. महाविकास आघाडीने महामोर्चा काढत तीव्र निषेध नोंदवला. भाजपने मात्र राज्यपालांना आजवर पाठीशी घालण्याचे प्रयत्न केल्याचे दिसून येते.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ही वादग्रस्त वक्तव्य केली : मुंबईत पैसा उरणार नाही, समर्थ रामदास यांच्याविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल? असे वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी केले होते. त्यामुळे चांगलेच अडचणीत आले. या वादावर छत्रपती शिवाजी महाराजांवरील आपले विधान प्राथमिक माहितीच्या आधारे होते. आता त्या संबंधी नवीन निष्कर्ष समजल्याचे आणि तोच पुढे नेण्याचा आपला प्रयत्न असल्याचे सांगत त्यांनी सारवासारव केली. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले. राज्यपाल म्हणाले की, कल्पना करा की सावित्री बाईंचे लग्न 10 वर्षी झाले, तेव्हा त्यांच्या पतीचे वय हे 13 वर्ष होते. कल्पना करा की लडके-लडकीया, मुलगा मुलगी लग्नानंतर काय करत असतील? लग्न झाल्यानंतर काय विचार करत असतील? एक प्रकारे तो कालखंड मूर्तीच्या पुढे फुले वाहण्याच्या, नतमस्तक होण्याइतकाच नव्हे, तर थोडा इतिहासाचा अभ्यास करण्याचा होता. वाजपेयींनी अणुचाचणी करून भारताची कणखर प्रतिमा जगाला दाखवल्याचे वादग्रस्त विधान कोश्यारी यांनी केले. त्यावरूनही प्रचंड वादंग निर्माण झाला होता.
राज्यपाल हटावसाठी मोहिम सुरू : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagatsinh Koshyari ) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या विधानानंतर राज्यात मोठा वादंग निर्माण झाला होता. आता तर महाविकास आघाडी सह सर्वच विरोधकांनी मोठी आघाडी उघडली. खासदार उदयनराजे, संभाजीराजे यांच्यासह अनेक शिवप्रेमी संघटना राज्यपालांविरोधात आक्रमक झाल्या. 'राज्यपाल हटाव'साठी मोहीम सुरु झाली. दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे उत्तराखंड राज्यात जाण्याच्या मनस्थितीत आहेत. भाजपच्या पक्षश्रेष्ठींने तशी विनंती सुध्दा केली आहे. परंतु, पक्षश्रेष्ठींकडून सुटका होत नसल्याची खंत राज्यपालांनी बोलून दाखवल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले होते.