नागपूर - लोकसभेसाठीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. मात्र, नागपूर लोकसभेच्या दिग्गज उमेद्वारांच्या नावा पुढे चक्क रिजेक्टेड असे स्टॅम्प मारण्यात आले आहे. काँग्रेस नगर येथील न्यू इंग्लिश शाळेच्या मतदान केंद्राबाहेर लागलेल्या यादी समोर काही उमेदवारांच्या नावासमोर रिजेक्टेड असा स्टॅम्प मारल्याचे आढळून आले.
नितीन गडकरी यांच्या नावपुढे देखील हा स्टॅम्प दिसला. मतदानाच्या सुरूवातीलाच असे चित्र आढळून आल्याने भाजप पदाधिकारी मतदान केंद्रावर पोहचले आणि या यादीवर आक्षेप घेत निवडणूक अधिकाऱ्यांकडे संबंधित यादीबद्दल तक्रार केली. यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी उमेद्वारांच्या नावापुढे रिजेक्टेड स्टॅम्प असलेली यादीच काढून टाकली आहे.