नागपूर - नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यात तापमानाचा पारा ४६ अंशावर पोहचला आहे. प्रादेशिक हवामान विभागाने २ दिवसांसाठी 'रेड हिट अलर्ट'ची घोषित केला आहे. वातावरणात प्रचंड उष्णता असल्याने सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. रेड हिट अलर्टमुळे सामान्य तापमानापेक्षा ६ ते ७ अंश अधिकच्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
उष्माघातामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या चारवर पोहचली आहे. त्यामुळे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी नागरिक सनकोट, स्कार्फ, छत्रीचा वापर करतानाचे चित्र नागपुरात दिसत आहे. तसेच उष्णतेच्या लाटेने गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्येदेखील वाढ झाली आहे. त्यामुळे नागपूरकर हैराण झाले आहेत.