नागपूर - विदर्भात सर्वाधिक थंडीचे प्रमाण नागपुरात नोंदवले गेले आहे. आज (29 डिसेंबर) सर्वात कमी ५.३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर, काल तापमान ५.१ अंश सेल्सियस होते.
हेही वाचा - थंडी आली अन् चोऱ्यांना सुरुवात झाली.. एका घरातून ३५ तोळे सोने व रोकड लंपास
दोन दिवसांच्या ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसानंतर थंडीचे प्रमाण वाढले आहे. शहरात शितलहर पसरली आहे. उत्तर भागातून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे तापमानात घट झाल्याचे वैज्ञानिकांचे मत आहे. ३० डिसेंबरपर्यंत तापमानात घट राहिल, असे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले आहे. ३० डिसेंबर ते २ जनेवारी दरम्यान अवकाळी पावसाचा अंदाजदेखील हवामान विभागाने वर्तवला आहे.