नागपूर - सत्ता स्थानपेच्या संघर्षामध्ये विदर्भ वेगळा करण्याची योग्य वेळ आहे. मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटत नाही आहे. त्यामुळे विदर्भ वेगळा करून विदर्भासाठी मुख्यमंत्री द्या, अशी मागणी विदर्भवादी नेते राम नेवले यांनी केली आहे.
हे वाचलं का? - 'हम होंगे कामयाब'; संजय राऊतांचे रुग्णालयातून ट्विट
भाजपने २०१४ ला वेगळ्या विदर्भाचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांनी आश्वासन पूर्ण केले नाही. आता भाजपने सत्ता स्थापनेसाठी असमर्थता दर्शवली. त्यानंतर सेनेने वेळ मागितल्यावर राष्ट्रपतींनी त्यांना वेळ वाढवून देण्यास नकार दिला. त्यानंतर राज्यपालांकडून राष्ट्रवादीला विचारणा करण्यात आली. मात्र, त्यांनी देखील ३ दिवसांची मुदत मागितली. आता सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे मिळून सरकार स्थापन झाले तरी मुख्यमंत्री हा पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाड्याचा होईल. त्यामुळे वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पुन्हा प्रलंबितच राहील. त्यामुळे भाजपने दिलेला शब्द पाळत विदर्भ वेगळा करावा आणि आम्हाला वेगळा मुख्यमंत्री द्यावा, अशी मागणी नेवले यांनी केली आहे.