नागपूर - राज्यभरात हुक्का पार्लवर बंदी असून देखील नागपुरातील सदर परिसरात सर्रासपणे सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर छापेमारी करण्यात आली. झोन २ च्या उपायुक्त विनिता साहू यांनी हुक्का पार्लरवर कारवाई करत सुगंधी तंबाखू, हुक्क्याचे पॉट हे साहित्य जप्त करुन 12 जणांना ताब्यात घेतले.
नागपुरात अनेक ठिकाणी हप्तेखोरांच्या मदतीने हुक्का पार्लर सुरू आहेत. हुक्का पार्लवर कारवाईची मोहीम पोलिसांनी घेतली असून शहरात ठिकठिकाणी छापा मारले जात आहेत. उपायुक्त विनिता साहू यांनी केलेल्या कारवाईबद्दल बोलत होत्या. त्या म्हणाल्या, "सदर परिसरातील चर्चित रेस्टॉरंटच्या बाजूला अशाच प्रकारे 'हुक्का पार्लर’ चालवले जात होते. ‘ठिकाणा पार्लर’मध्ये अनेक तरुण-तरुणी हुक्का ओढत असताना दिसले. याचवेळी पोलिसांचा छापा पडताच तेथे धावपळ झाली. पोलिसांनी 12 तरुण आणि तरुणींना तेथून ताब्यात घेतले असून यात पार्लरच्या मालक आणि व्यवस्थापकाचा समावेश आहे."