ETV Bharat / state

आमदार अपात्र प्रकरण: शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंची उलट तपासणी पूर्ण, सोमवारी दीपक केसरकर यांचा नंबर - दिलीप लांडे आणि योगेश कामत

MLA Disqualification Case : शिवसेना (Shiv Sena) आमदार अपात्रता सुनावणीत (MLA Disqualification Case) आज शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंची उलट (Rahul Shewale) तपासणी करण्यात आली. वकील देवदत्त कामत यांच्याकडून खासदार राहुल शेवाळे यांच्यावर प्रश्नांचा भडीमार सुरू करण्यात आला होता.

Mla Disqualification Case
आमदार अपात्र प्रकरण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 9, 2023, 3:39 PM IST

नागपूर Mla Disqualification Case : आमदार अपत्रतेचं प्रकरण निर्णायक वळणावर आलं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या दालनात आमदार अपत्रतेची सुनावणी सुरू असून आज शिवसेना पक्ष खासदार राहुल शेवाळेंची उलट (Rahul Shewale) तपासणी करण्यात आली. नागपूरला हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाल्यापासून सुनावणीला देखील वेग आलाय. दरम्यान शुक्रवारी उध्दव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाचे वकील देवदत्त कामत यांनी आमदार दिलीप लांडे आणि योगेश कदम यांची उलट तपासणी घेतली होती. त्यानंतर आज खासदार राहुल शेवाळे यांची उलट तपासणी करण्यात आलीय.

राहुल शेवाळेवर प्रश्नांचा भडिमार सुरू : आमदार अपात्रता प्रकरणाची सुनवाई निरंतर सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या सोबत गेलेल्या दिलीप लांडे आणि योगेश कामत यांना ठाकरे गटाच्या वकिलांनी उलट तपासणी दरम्यान प्रत्येकी शंभरपेक्षा ही अधिक प्रश्न विचारले होते. त्याचं प्रमाणे आज खासदार राहुल शेवाळेंवर देखील प्रश्नांचा भडिमार केला होता. एकच प्रश्न अनेकदा विचारले जात असल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

सोमवारी दीपक केसरकरांची बारी : आजची सुनवाईची प्रक्रिया संपली असून आता सोमवारी शिंदे गटाचे नेते दीपक केसरकरांची (Deepak Kesarkar) उलट तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर उदय सामंत आणि दादा भुसे यांचा नंबर आहे. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशन दरम्यान आमदार दिलीप लांडे, योगेश कामत खासदार राहुल शेवळेंची उलट तपासणी पूर्ण झाली आहे.

उध्दव ठाकरेंच्या हजेरीपटवर शिंदे गटाच्या आमदारांच्या सह्या : तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी वर्षा या शासकीय बंगल्यावर घेतलेल्या बैठकीत शिंदे गटात गेलेल्या एकूण २३ आमदारांच्या सह्या असल्याची बाब उद्धव गटाचे वकील देवदत्त कामत यांनी काल सुनावणी दरम्यान उघड केली आहे. हजेरीपटवर या आमदारांच्या सह्या असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. त्यावर शिंदे गटाचे आमदार योगेश कदम आणि दिलीप लांडे यांनी सांगितलं की, सह्या या आधीच घेण्यात आल्या होत्या.

हेही वाचा -

  1. आमदार अपात्रता प्रकरणात सुनील प्रभू यांची उलटतपासणीत गंभीर चूक
  2. आमदार अपात्र प्रकरणी सुनील प्रभू सलग तिसऱ्या दिवशी जेठमलानींच्या टार्गेटवर; पुढील सुनावणी २८ नोव्हेंबरला
  3. ठाकरे गटाकडून बनावट कागदपत्रं सादर, शुक्रवारपासून शिंदे गटाची उलट तपासणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.