नागपूर: महाविकास आघाडी सरकारने विद्यापीठ विधेयक विधानसभेत मंजूर करून शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात राजकारण आणण्याचे काम करत आहे, असा आरोप करत भाजपा युवा मोर्चाने केला आहे. भाजपा युवा मोर्चाच्या युवती आघाडीच्या वतीने नागपुरातील रवी भवन येथील पालकमंत्री नितीन राऊत (Nagpur Guardian Minister Nitin Raut) यांच्या शासकीय निवासस्थान समोर रांगोळी काढून निषेध व्यक्त (Protest by removing rangoli Ravi Bhavan)केला. तसेच त्यांच्या घरासमोर काळे विधेयक मागे घ्या म्हणत फलक लावून जाहीर निषेध नोंदवला आहे. विद्यापीठ विधेयक चुकीच्या पद्धतीने पारित केले. हे विधेयक सभाग्रहामध्ये चर्चा न करता पारित करण्यात आले आहे. हे विधेयक विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी धोक्याचे आहे.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणात राजकारण करण्याचे पाप महाविकास आघाडी सरकार करत असल्याचाही, आरोप भाजपा युवा मोर्च्याच्या युवती प्रमुख शिवानी दाणी (Shivani Dani, Yuvati Pramukh Yuva Morcha) यांनी केला. हे सरकार स्वतःच्या स्वार्थासाठी विधेयक मंजूर करत आहे. विद्यापीठाच्या जमिनी लाटण्याचा हा सगळा घाट आहे. विद्यापीठात विधेयक मान्य करून राजकारण करू नये. हे काळे विधेयक वापस घ्या अशी मागणी युवतीच्या वतीने रांगोळी काढून करण्यात आली. हे सरकार झोपलेले आहे. या सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी करण्यासाठी आम्ही रात्रीच्या सुमारास आंदोलन करत असल्याचेही म्हणाले.
कारण हे सरकार इतके झोपेत आहे, की रात्रीच्या सुमारास कोणी यांच्या बंगल्यात समोर काही करूनही गेले तरी यांना कळतं नाही. हीच परिस्थिती दाखवण्यासाठी आंदोलन केले आहे. त्यामुळे त्वरित हे काळे विधेयक मागे घ्या अन्यथा उद्या युवा वर्ग रस्त्यावर उतरला तर या सर्व परिस्थितीला महाविकास आघाडी सरकार जबाबदार असणार आहे. यापूर्वी सुद्धा भाजपा युवा मोर्चाच्या वतीने लाखो पोस्टकार्ड हे मुख्यमंत्र्यांना पाठवले (Millions of postcards sent to the CM) गेले होते. विद्यापीठात विधेयक मागे घ्या, या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्र्यांना आणि उच्च शिक्षण मंत्र्यांना मिस कॉल देऊन हे आंदोलन करण्यात आले होते.
हेही वाचा - School Reopen Maharashtra : मेस्टाच्या निर्णयामुळे राज्यातील 'या' शाळा सुरु होणार :