नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना आवडणारे निर्णय घेण्यापेक्षा जनतेच्या हिताचे निर्णय घेतले. त्यामुळे आज आपल्या देशाने जगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मोदी सरकारने साडे आठ वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या कामांचा पाढा वाचला. काश्मीरमधून कलम 370 हटवणे, कोरोना काळात आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देणे, 80 कोटी लोकांना निशुल्क अनाज उपलब्ध करून दिल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला. आझादीचा अमृत महोत्सव साजरा होत आहे, या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन सूत्री कार्यक्रम हाती घेतला आहे. ज्यातील बऱ्याचं गोष्टी या नऊ वर्षात पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांपासून 100 वर्षाच्या कालावधीत भारत काय करणार याचा रोडमॅप पीएम मोदी यांनी आपल्या सर्वांच्या समोर ठेवला आहे.
सुरक्षेच्या बाबतीत आत्मनिर्भर : येणारे 25 वर्ष देशातील सर्व लोकं एक ध्येय समोर ठेवून वाटचाल करणार आहेत. गेल्या 9 वर्षात आपण बरेच काही प्राप्त केले आहे. आपल्याला हत्यार, शस्त्र नाही मिळाले तर भारत आपली सुरक्षा नाही करू शकणार असे बोलले जायचे. मात्र, गेल्या 9 वर्षात भारत सुरक्षेच्या बाबतीत 70 टक्के आत्मनिर्भर झाला आहे. कोरोना काळात मोदींच्या सांगण्यावरून देशाने संयम पाळला. जनता कर्फ्यु हा 130 कोटी जनतेने पाळला. लालबहादूर शास्त्री यांनी जनतेला आवाहन केल्यावर लोकांनी शनिवारी जेवणे सोडले होते. त्यानंतर मोदींच्या सांगण्यावरून जनतेने संयम पाळून दाखविला. लोकं म्हणतात मोदी यांनी कोरोनात देश लॉक डाऊन केला. लोकांचे जीव वाचवण्यासाठी लॉकडाऊन केला. लस बनल्यानंतर लॉकडाऊन खुले केले. दोन वर्ष 80 कोटी लोकांना मोदी यांनी धान्य दिले असे कुठेच झाले नव्हते असे शाह म्हणाले.
म्हणून आम्ही जिंकतो : मोदी सरकारने अनेक कटू निर्णय घेतले. मोदी सरकारने लोकांना चांगले वाटावे असे निर्णय नाही घेतले. तर लोकांचे चांगले व्हावे असे निर्णय घेतले. लोकशाहीत लोकांना आवडणारे निर्णय घेणे सोपे असते. मात्र लोकांचा चांगला होईल असे निर्णय घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे मोदींच्या नेतृत्वात आम्ही एकानंतर एक निवडणूक जिंकत आहोत. आम्ही कधीही वोट बँकेचे राजकारण करत नाही. मोदी सत्तेत येण्यापूर्वी देशातील तीन भाग आंतरिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आव्हानात्मक होते. काश्मीर, ईशान्य भारत आणि दंडकारण्य हे तीन क्षेत्र होते. आज या तिन्ही क्षेत्रात हिंसेत 80 टक्के कमतरता झाली आहे. नक्षलवादी हिंसे संदर्भात देशातील 160 जिल्हे संवेदनशील होते. त्यात कमी आली आहे. डाव्यांच्या दहशतवादापासून अनेक राज्य मुक्त होत आहे. नक्षलवाद आता छोट्याशा भागापुरता मर्यादित राहिला आहे. तिथे सुरक्षा दल लढा देत आहे. आम्हाला विश्वास आहे तिथे भारताचा विजय होईल. महाराष्ट्राला पत्रकारितेचा उज्ज्वल इतिहास लागला आहे. पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण, तर लोकमान्य टिळकांनी केसरी सुरू केले. केसरी ने स्वातंत्र्य लढ्याला देशभर पोहचवले. असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - Prakash Ambedkar On EC : पक्षांतर्गत वादावर निवाडा करण्याचा अधिकार आयोगाला आहे का? - प्रकाश आंबेडकर