ETV Bharat / state

Draupadi Murmu on Vidarbha Visit: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आजपासून 3 दिवस विदर्भ दौऱ्यावर, गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात होणार सहभागी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पहिल्यांदाच आजपासून तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचे स्वागत करण्यासाठी आज नागपूरमध्ये अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत. रविवारी अजित पवारांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच ते तिघे एकत्र कार्यक्रमात असणार आहेत. नागपूरमध्ये अजित पवार यांचे बॅनर लावलेले पाहावयास मिळत आहे.

Draupadi Murmu
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु
author img

By

Published : Jul 4, 2023, 8:26 AM IST

नागपूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज विदर्भ दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपतीपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच विदर्भ दौरा आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज सायंकाळी 7 वाजता नागपुरमध्ये आगमन होणार आहे. गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ तसेच कोराडीतील सांस्कृतिक केंद्राच्या उद्घाटन सोहळ्याला त्या उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित राहणार आहेत.

गोंडवाना विद्यापीठाचा 10 वा दीक्षांत समारंभ : आज त्यांच्या नागपुरातील मुक्कामानंतर राष्ट्रपती 5 जुलैला सकाळी गडचिरोलीला जाणार आहेत. तेथे गोंडवाना विद्यापीठाचा 10 वा दीक्षांत समारंभ तसेच अडपल्ली कॅम्पस येथील प्रस्तावित प्रशासकीय इमारतीच्या कोनशिला समारंभाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमानंतर राष्ट्रपती नागपुरात परतल्यावर दुपारी कोराडीतील महालक्ष्मी देवीचे दर्शन व आरतीमध्ये त्या सहभागी होतील. त्यानंतर कोराडी मंदिर परिसरातील सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे.

राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी प्रशासन सज्ज : 6 जुलै रोजी सकाळी राष्ट्रपती आदिवासी समाज बांधवांशी राजभवन येथे संवाद साधणार आहेत. त्यानंतर मुंबईकडे प्रस्थान करतील. राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी प्रशासन सज्ज असून कार्यक्रमस्थळी तसेच शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहणार आहे. कोराडी येथे भारतीय विद्या तर्फे भवनच्या रामायण सांस्कृतिक केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. या रामायण सांस्कृतिक केंद्रात चित्र स्वरूपात रामायणाची आकर्षक मांडणी करण्यात आली आहे. तीन एकर जागेवर दक्षिण भारतीय शैलीत हे सेंटर तयात करण्यात आले आहे. दुमजली इमारत आहे, ज्याच्या पहिल्या मजल्यावर महाकाव्य रामायणातील प्रसंग विविध चित्रांच्या स्वरूपात मांडलेले आहेत.

हेही वाचा :

  1. NCP Politics Crisis: छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळात प्रवेशाने भाजप आमदारांचे मंत्रीपद हुकणार? राजकीय विश्लेषक म्हणतात...
  2. Maharashtra Politics Crisis Update : अजित पवारांचे मुंबईत स्वतंत्र प्रदेश कार्यालय होणार सुरू, शरद पवारांना मोठा धक्का
  3. Maharashtra Political Crisis: असं घडतंय हे मी जाहीरपणे..; राष्ट्रवादीतील बंडाळीबाबत पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले, पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.