नागपूर : नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वस्तीतून आठ महिन्यांचे बाळ चोरी प्रकरणात (Baby Theft Case Nagpur) मुख्य आरोपी प्रजापती दाम्पत्याला अटक (Baby Stealing Prajapati Couple Arrested Balaghat) झाल्यानंतर रोज नवनवीन खुलासे होऊ लागले आहेत. बाळ चोरी प्रकरणातील मुख्य आरोपी योगेंद्र प्रजापती आणि त्याची पत्नी रिटा हिला मध्यप्रदेशच्या बालाघाट येथून पळत असताना पोलिसांनी अटक केल्यानंतर चौकशी सुरू झाली आहे. आरोपींनी 51 महिन्यात 5 बाळ जन्माला घातले. यापैकी स्वत:च्या (Sale of Own Baby) 3 बाळांसह तब्बल 7 ते 9 मुलांची विक्री (Child Trafficking Case) केल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर शहर पोलिस प्रकरणाच्या मुळाशी जाण्याच्या प्रयत्नात असून आणखी नवीन माहिती पुढे येण्याची शक्यता आहे.
प्रजापती दाम्पत्याला बालाघाट येथून अटक - दहा नोव्हेंबर रोजी प्रजापती दाम्पत्याने आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण/चोरी केली होती. बाळाच्या आई वडिलांनी बाळाचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी अवघ्या चार ते पाच तासात चार आरोपींना अटक केली होती. मात्र, मुख्य सूत्रधार योगेंद्र आणि रिटा प्रजापती पळून जाण्यात यशस्वी झाले होते. तेव्हापासून पोलीस आरोपींच्या मागावर होते. पोलिसांनी प्रजापती दाम्पत्याला बालाघाट येथून अटक केल्यानंतर नागपूरला आणण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू झाली आहे.
स्वतःच्या तीन मुलांची विक्री: बाळ चोरी प्रकरणातील मुख्य आरोपी योगेंद्र प्रजापती आणि रिटा मूळचे राजस्थान येथील रहिवासी आहेत. योगेंद्र आणि प्रजापतीचे लग्न 2017 साली झाले होते. 2018 साली त्यांना पाहिले अपत्य झाले. पहिल्या मुलाची 25 हजारात विक्री केल्यानंतर प्रजापती दाम्पत्याने स्वतःच्या आणखी दोन मुलांची विक्री केली अशी माहिती पुढे आली आहे.
51 महिन्यात 5 बाळांना जन्म - मुख्य आरोपी योगेंद्र प्रजापती आणि रिटा यांना अटक झाल्यानंतर एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 2018 साली पाहिले अपत्य झाले होते. 51 महिन्यात रिटा प्रजापती यांनी तब्बल 5 बाळांना जन्म दिला. त्या हिशोबाने दर दहा महिन्यात एका बाळाला जन्म रिटा प्रजापती यांनी जन्म दिला. पाच पैकी तीन बाळांची मध्यप्रदेशातील विविध जिल्हात विक्री केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. त्या वरून पोलीस बाळ विकत घेणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे.
डीएनए चाचणीचा पर्याय खुला ?
प्रजापती दाम्पत्याने मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र येथील 7 ते 9 लहान बाळांची विक्री केल्याची माहिती पुढे आल्यानंतर पोलीसांनी त्या सर्व बाळांचे रेस्क्यू सुरू केले आहे. विक्री केलेल्या बाळांपैकी 3 बाळ स्वतःचे असल्याचं सांगितले आहे. मात्र त्यांचा दावा पटण्यासारखा नाही त्यामुळे पोलिस डीएनए चाचणीच्या पर्याया बद्दल विचार करत आहे.