ETV Bharat / state

आता दिवा पेटला?  इटलीप्रेमावरुन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचा भाजपसह नरेंद्र मोदी यांना टोला - power minister dr. nitin raut criticized on pm modi

पंतप्रधान मोदींनी रविवारी (दि. 5 एप्रिल) घरातील विजेचे दिवे रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी बंद करा आणि पणत्या, मेणबत्त्या लावा असे सांगितले. यावर डॉ. राऊत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, मोदींच्या घोषणेनंतर मी लगेच माझ्या सर्व ज्येष्ठ अभियंत्यांसोबत तातडीने चर्चा केली. अचानक दिवे बंद झाले तर विद्युत पुरवठ्यावर किती तांत्रिक अडचणी, भार येईल हे स्पष्ट करणारा एक व्हिडीओ मी कालच प्रसारित केला. कोरोनाचा सामना करण्यासाठी भारत एकजुटीने उभा आहे, हे प्रत्यक्ष दिसताना, कोरोनाचा मुकाबला पणत्या लावून आणि दिवे विझवून कसा होणार?, असा सवाल देखील डॉ. राऊत यांनी केला आहे.

उर्जामंत्री नितीन राऊत
उर्जामंत्री नितीन राऊत
author img

By

Published : Apr 4, 2020, 8:25 PM IST

नागपूर - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या इटलीत झालेल्या जन्मावरून त्यांची हेटाळणी करण्यात भाजपचा जन्म गेला. मोदी आणि त्यांचे असंस्कृत सहकारी, सोनिया गांधी, राहुल गांधी इटलीवरुन किती अश्लिल, अश्लाघ्य बोललेत याची गिणतीच करता येणार नाही. पण, थाळ्या वाजवा, लाईट विजवा, मेणबत्त्या लावा या कल्पना मात्र त्यांनी थेट कोरोनाग्रस्त इटलीवरुन आयात केल्या आहेत. आपले अपयश झाकायला, लोकांना एक "इव्हेंट" द्यायला यांना सोयिस्कररित्या इटली चालते, तिथे यांचे बेगडी देशप्रेम, हिंदुत्व आडवे येत नाही, अशी टीका ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री डॉ. नीतीन राऊत यांनी भाजप व मोदी यांच्यावर केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची हाफ पॅन्टसुद्धा डॉ. मुंजे यांनी इटलीच्या बेनिटो मुसोलिनीकडूनच आणली होती असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

बोलताना उर्जामंत्री नितीन राऊत

कोणी कधी, किती दिवे लावावे आणि विझवावे, कुठल्या कारणासाठी पेटवावे आणि विझवावे, हा प्रत्येकाचा खासगी प्रश्न आहे. मी राज्याचा ऊर्जामंत्री असलो तरी त्यात मी हस्तक्षेप करु शकत नाही. लोकांच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा माझा आणि माझ्या पक्षाचा स्वभाव सुद्धा नाही. कोणी काय खावे, काय प्यावे, काय लावावे हे सुद्धा आजकाल संस्कृती रक्षक ठरवतात. पण आम्ही वेगळे आहोत अशी, टीका देखील त्यांनी भाजपवर केली आहे.

पंतप्रधानांनी रविवारी (दि. 5 एप्रिल) घरातील विजेचे दिवे रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी बंद करा आणि पणत्या, मेणबत्त्या लावा असे सांगितले. यावर डॉ. राऊत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, मोदींच्या घोषणेनंतर मी लगेच माझ्या सर्व ज्येष्ठ अभियंत्यांसोबत तातडीने चर्चा केली. अचानक दिवे बंद झाले तर विद्युत पुरवठ्यावर किती तांत्रिक अडचणी, भार येईल हे स्पष्ट करणारा एक व्हिडीओ मी कालच प्रसारित केला. कोरोनाचा सामना करण्यासाठी भारत एकजुटीने उभा आहे, हे प्रत्यक्ष दिसताना, कोरोनाचा मुकाबला पणत्या लावून आणि दिवे विझवून कसा होणार?, असा सवाल देखील डॉ. राऊत यांनी केला आहे.

2014 नंतर भारतीय अर्थव्यवस्था रसातळाला जात आहे. विजेचा वापर दिवसेंदिवस कमी होत आहे. तो अर्थव्यवस्थेच्या वाढीचे एक महत्त्वाचे मापक असतो हे सनातन सत्य आहे. वीज वापर घटली ही टाळ्या पिटण्यासारखी गोष्ट नाही. देशातील बहुतांश औष्णिक ऊर्जा प्रकल्प फक्त 49 टक्के क्षमतेवर चालू आहेत. अर्थातच सरकारी बँकांच्या कर्ज थकवणाऱ्यांमधे ते आघाडीवर आहेत. आधी नोटबंदी, नंतर जी.एस.टी., अशा तुघलकी निर्णयांमुळे लघु आणि मध्यम उद्योगधंदे गर्तेत गेले. एकेकाळी गजबजलेल्या महाराष्ट्रातील सर्व एमआयडीसीच्या आवारात आज स्मशान शांतता असते. मेक-इन-इंडिया, स्टार्ट-अप-इंडिया, स्किल-इंडिया अशा आकर्षक नावे असलेल्या 206 घोषणा सहा वर्षे ऐकल्या. पण, जाहिरातबाजी आणि पंचतारांकित समारंभ, याशिवाय त्यातून काही एक निर्माण झाले नसल्याची टीका डॉ. राऊत यांनी केली.

वीज मंडळे तोट्यात गेली हे काही माझे एकट्याचे दुःख नाही. भारताच्या प्रत्येक राज्याचा ऊर्जामंत्री माझ्यासारखेच अश्रू ढाळतो आहे. मग तिथे सरकार कुठल्याही पक्षाचे असो. अशावेळी विजेचे दिवे बंद करायला लावणे म्हणजे आधीच उपाशी, त्यात सक्तीची एकादशी असला अचरट प्रकार झाला असल्याचे डॉ. राऊत म्हणाले.

हेही वाचा - "नितीन राऊत हे तांत्रिक कारण सांगून जनतेला पंतप्रधानांच्या आवाहनापासून दूर करताहेत"

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.