नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कन्हान पोलीस ठाण्यात कार्यरत एका पोलीस हवालदारावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना चार दिवसांपूर्वी घडली होती. रवी चौधरी असे जखमी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले असून पोलिसांनी आतापर्यंत 4 सराईत आरोपींना अटक केली आहे.
नागपूर जिल्ह्यातल्या कन्हानमध्ये पोलीस हवलदार रवी चौधरी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाला आहे. चित्रपटात घडते तसेच गुन्हेगार पोलिसाचा रस्त्यावर पाठलाग करत त्याच्यावर चाकूने हल्ला करतानाचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. आजूबाजूला रस्त्यावर वर्दळ सुरू असतानाही कोणीही पोलिसाच्या बचावास येत नाही, हे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत कमलेश मेश्राम, अमान खान, कपिल रंगारी यासह एकूण चार आरोपींना अटक केली आहे.
कमलेश मेश्रामच्या भावावर पोलिसांनी केलेल्या प्रतिंबधात्मक कारवाईच्या रागातून हा हल्ला 16 तारखेला रात्री कन्हान येथील गहु हिवरा चौकात झाला होता. गुंड पोलिसाचा रस्त्यावर पाठलाग करत त्याला रस्त्यावर लोळवून त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करत होते. ही घटना धक्कादायक घटना परिसरात असलेल्या सीसीटीव्हत कैद झाली आहे. तर, गृहमंत्र्यांचा जिल्हा असलेल्या नागपुरात पोलिसांचा धाकच राहिला नसल्याचे दुर्दैवी चित्रदेखील या माध्यमातून स्पष्ट होताना दिसत आहे.
हेही वाचा - दशक्रिया कार्यक्रमासाठी नदीवर गेलेले तिघे गेले वाहून, एकाचा मृतदेह सापडला