नागपूर - ट्रकमधील डिझेल चोरी प्रकरणात अटक झाल्यानंतर न्यायालयाकडे त्या आरोपीचा पीसीआर न मागितल्यामुळे अप्रत्यक्षरित्या जामीन मिळण्यास मदत केल्याच्या मोबदल्यात पाच हजारांची लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक आणि त्याच्या मदतनीसला रंगेहात अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक भारत थिटे आणि मदतीस अमंलदार अमित पवार, असे अटक करण्यात आलेल्या लाचखोरांचे नाव आहे.
हेही वाचा - यूपीएससीच्या मार्गदर्शनाच्या नावावर आयकर आयुक्तांकडून महिला डॉक्टरचे शारीरिक शोषण, बलात्काराचा गुन्हा दाखल
या प्रकरणातील तकारदार हे मोठा नागपूरच्या ताजबाग येथील रहिवासी आहेत. त्यांचा कुही पोलीस स्टेशन हद्दीत ढाबा आहे. तक्रारदार यांच्या विरुद्ध ट्रक मधिल डिझेल चोरी संदर्भात पोलीस स्टेशन कुही येथे गुन्हा नोंद असून या गुन्ह्यात त्यांना पोलीस उपनिरीक्षक भारत रमेश थिटे यांनी अटक केली होती. तक्रारदाराला न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने जामीनावर सोडले होते. डिझेल चोरीच्या गुन्ह्यात पीसीआर न घेतल्याचा मोबदला म्हणून, तसेच गुन्ह्यात तक्रारदाराला सहकार्य करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक भारत रमेश थिटे यांनी १० हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराला लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
अतिशय गोपनीय पद्धतीने तकारीची शहानिशा करून पोलीस उपनिरीक्षक भारत रमेश थिटे याच्या विरुद्ध सापळा रचण्यात आला होता. त्यानुसार लाचेचा पहिला हप्ता म्हणून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस शिपाई अमित शंकर पवार याला नागपूर-उमरेड मार्गावरील पाचगाव चौकी येथे अटक करण्यात आली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक भारत थिटे याला देखील अटक करण्यात आली.
हेही वाचा - नागपुरात कोविड वार्डात धुडगूस घालणाऱ्या दोघांना अटक, घटना सीसीटीव्हीत कैद