ETV Bharat / state

सेवानिवृत्तीनंतरच्या सर्व कार्यक्रमांना फाटा देत फुलांचा वर्षाव करून सहकाऱ्याला दिला निरोप

author img

By

Published : Apr 30, 2020, 2:31 PM IST

कोरोनाचा फटका शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या सोहळ्याला बसलेला आहे.

police-officer-retirement-story-from-nagpur
सेवानिवृत्तीनंतरच्या सर्व कार्यक्रमांना फाटा देत फुलांचा वर्षाव करून सहकाऱ्याला दिला निरोप

नागपूर - कोरोनाच्या धास्तीने राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय कार्यक्रम अनिश्चित काळासाठी रद्द झाले आहेत. तर कोरोनाच्या भीतीपोटी अनेकांना लग्न आणि खासगी कार्यक्रमसुद्धा नाईलाजाने रद्द करावे लागले आहेत. अशाचप्रकारे कोरोनाचा फटका शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या सोहळ्याला बसलेला आहे.

पूर्वी धुमधडाक्यात निवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली जायची. मात्र कोरोनामुळे या परंपरेलासुद्धा फाटा द्यावा लागला आहे. नागपुरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या खुफिया विभागातील कर्मचारी राजेंद्र सिंग ठाकूर यांनी 35 वर्ष पोलीस खात्याची सेवा केल्यानंतर आज ते सेवानिवृत्त होत असताना त्यांचा निरोप समारंभ अविस्मरणीय व्हावा, असे सर्वांनाच वाटत होते, पण कोरोनाच्या संकटापुढे हे शक्य नसल्याने पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून निरोप दिला आहे.

लॉकडाऊनमुळे फुलांचा हार किंवा गुच्छे मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांनी घरीच हार-तुरे तयार करून राजेंद्रसिंग ठाकूर यांचा सेवानिवृत्त नंतरचा निरोप समारंभ साजरा केला आहे. सहकाऱ्यांचे प्रेम पाहून ठाकूर यांचे डोळे पाणावले होते. ज्या ठिकाणी 35 वर्ष कर्तव्य बजावले त्या कर्मभूमीतुन निघतांना ते भावूक झाले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.