नागपूर : तीनही मुले शनिवारी दुपारी बेपत्ता झाली होती. रात्री सात वाजल्याच्या सुमारास पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम हाती घेतली असता अनेकांनी मुलांना इथे तिथे बघितल्याचे सांगितले. हजारो सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले. बेपत्ता झालेली मुले परिसराबाहेर गेली नाहीत, असे कन्फर्म झाल्यानंतर रविवारी परिसरात पुन्हा कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. तेव्हा एका गाडीत त्या मुलामुलींचे मृतदेह मिळून आले.
सध्या सर्व दृष्टीने तपास सुरू आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर तपासाला दिशा मिळेल. सध्या अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. - पोलीस आयुक्त अमितेशकुमार
पोस्टमार्टम अहवालाची प्रतीक्षा : प्रथमदर्शनी तपासात हे दिसून येत आहे की, ते मुले खेळण्याच्या उद्देशाने गाडीमध्ये गेली असावी. गाडीचे दार बाहेरून उघडत होते. मात्र, आतून उघडत नसल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही. गाडी नादुरुस्त होती. प्रथमदर्शनी तीनही मुलांचा मृत्यू हा गुदमरून झाल्याचे दिसून येत आहे. पोलिसांना शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. त्यात मुलांच्या शरीरावर कुठे जखमा किंवा अन्य मार्क आढळून आले नाही. शवविच्छेदनाच्या अंतिम अहवालाची प्रतीक्षा नागपूर पोलिसांना आहे. त्यानंतरच मुलांच्या मृत्यूचे नेमके कारण काय? याबद्दल ठोस माहिती कळेल, असे ते म्हणाले आहेत.
मायक्रो कोंबिंग ऑपरेशन : पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने शनिवारी रात्री परिसरात शोध मोहीम राबवली असता काहींनी टॉर्चलाईटच्या मदतीने कारमध्ये डोकावले होते. त्यावेळी कारमध्ये मुलांचे मृतदेह दिसले नाहीत, अशी चर्चा सुरू झाली आहे. कारवर खूप धूळ असल्याने आतील काहीच दिसत नव्हते. मात्र, काल जेव्हा मायक्रो कोंबिंग ऑपरेशन बघितले असता तिन्ही मुलांचे मृतदेह आढळून आले.
हेही वाचा :
- Nagpur Crime : बेपत्ता तीन मुलांचे मृतदेह आढळल्याने खळबळ, गुदमरून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती
- धक्कादायक! झाडावर लटकलेले आढळले आईसह तीन मुलांचे मृतदेह; वडिलांचाही आत्महत्येचा प्रयत्न
- Dead Bodies Of 3 Sisters in well : तीन सख्ख्या बहिणींसह दोन मुलांचे विहिरीत आढळले मृतदेह, छळ झाल्याने आत्महत्येचा संशय