ETV Bharat / state

Amitesh Kumar On Threatening Phone Call : मुंबईतील उद्योगपती, अभिनेत्यांना धमकीच्या फोनचा नागपूरशी संबंध नाही - पोलीस आयुक्त - पोलीस आयुक्त अमितेशकुमार

उद्योगपती मुकेश अंबानी, महानायक अमिताभ बच्चन तसेच अभिनेता धर्मेंद्र यांचे घर उडवून देण्याची धमकीचा फोन काल नागपूर येथील नियंत्रण कक्षाला आला होता. मात्र, धमकीच्या फोन कॉलचा नागपूरसोबत संबंध नसल्याची माहिती नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे.

Commissioner of Police
अभिनेत्यांना धमकीच्या फोनचा नागपूरशी संबंध नाही
author img

By

Published : Mar 1, 2023, 3:16 PM IST

अभिनेत्यांना धमकीच्या फोनचा नागपूरशी संबंध नाही

नागपूर : इन्फॉर्मेशनसाठीचे अत्यंत महत्त्वाचे कॉल सेंटर आहे. डायल 121 चे प्राइमरी कॉल सेंटर नवी मुंबईला तर सेकंडरी कॉल सेंटर नागपूरच्या लकडगंज येथे आहे. डायल 121 वर राज्याच्या वेगवेगळे भागातून कॉल येतात. पहिल्यांदा कॉल इतर प्रायमरी कॉल सेंटरवर जातो, त्यानंतर तो कॉल सेकंडरी कॉल सेंटरवर जातो. नागपूर येथे सेकंडरी कॉल सेंटरवर काल दुपारी एक कॉल आला होता. कॉलची सर्व संबंधित मुंबई पोलिसांशी संबंधित असल्यामुळे माहिती मुंबई कंट्रोल रूमला कळवण्यात आली आहे. या व्यतिरिक्त नागपूर शहर पोलिसांना आणखी कोणताही माहिती नाही अस पोलीस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले आहेत.

डायल १२१ राज्य पोलीस नियंत्रित करते : कॉलबद्दल आम्हाला काही माहिती नाही. त्याबद्दल मुंबई पोलीस टिपणी करू शकतात. डायल 121 चे कॉल सेंटर हे पोलीस आयुक्तालया अंतर्गत नसते तर राज्य पोलीस मुख्यालय कडून हे पूर्ण नियंत्रित केल्या जाते. एका गुंडाने जेलमध्ये बसून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात फोन करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण अगदी ताजं असताना आता नागपूर येथील डायल 121 कॉल सेंटरला एक निनावी फोन आला होता,ज्यामुळे मुंबई पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. फोन कुणी केला याचा शोध मुंबई पोलीस कसून घेत आहेत कारण पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीने थेट उद्योगपती मुकेश अंबानी, महानायक अमिताभ बच्चन तसेच अभिनेता धर्मेंद्र घर उडवून देण्याची धमकीचं दिली आहे. धमकी देणारा व्यक्ती कोण आहे, त्याने कुठून फोन केला आणि धमकी देण्यामागे त्याचा उद्देश काय याचा शोध नागपूर पोलिसांनी सुरू केला आहे. कॉल करणारा ट्रेस झाल्यानंतरचं या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.

काहीपूर्वी दिवसादेखील आला होता कॉल : मागील काही दिवसांमध्ये मुंबई पोलिसांच्या साउथ कंट्रोल रूमला देखील मुंबईतील बंदर परिसर आणि काही परिसरात बॉम्बस्फोट घडवून आणणार असल्याचा कॉल आला होता. त्यानंतर फक्त नऊ तासातच मुंबई पोलिसांनी हॉक्स कॉलरला डहाणू येथून अटक केली होती. अश्विन म्हैसकर असे आरोपीचे नाव आहे. मागील काही दिवसात वाहतूक विभागाचे सह पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांना देखील रात्री एकच्या सुमारास अज्ञात इसमाने कॉल करून मीरा-भाईंदर येथे बॉम्बस्फोट घडवून आणणार असल्याबाबत माहिती देणारा कॉल केला होता. त्याआधी देखील अनेक मुंबईवर दहशतवादी सावट असल्याचे निदर्शनास आणून देणारे कॉल प्राप्त झाले होते.

मुंबई रडारवर? : मागील काही दिवसांचा रेकॉर्ड पाहता मुंबईला सातत्याने धमक्यांचे फोन येत असल्याचे दिसून येत आहे. मुंबई दहशतवाद्यांच्या रडारवर असलेच यातून दिसून येते. गेल्या महिन्यात मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलला धमकीचा फोन आला होता. ज्यामध्ये अज्ञात व्यक्तीने शाळा उडवून देण्याची धमकी दिली होती. ऑक्टोबरमध्ये एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलला धमकीचा कॉल आला होता. ज्यात धमकी देणाऱ्या अज्ञात इसमाने हॉस्पिटल उडवून देण्याची आणि अंबानी कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे आढळले होती.

हेही वाचा : Rahul Gandhi New Look : राहुल गांधी दिसले नव्या लुकमध्ये! सोशल मीडियावर होतेय जोरदार चर्चा!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.