नागपूर - दागिन्यांची विक्री करणाऱ्या शहरातील दोन मोठ्या व्यापाऱ्यांसह तिघांना पिस्टल आणि काडतुसे खरेदी करताना पाचपावली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून काडतुसे आणि पिस्टल देखील जप्त करण्यात आले आहेत. नितेश राऊत आणि कोमल राऊत, असे व्यापाऱ्यांची नावे आहेत.
महिलेची हत्या करणाऱ्या नशेबाज अपंग आरोपीला 4 तासात अटक
इतवारी परिसरात मोठ्या प्रमाणात दागिन्यांची दुकाने आहेत. याच परिसरातील व्यापारी नितेश आणि कोमल राऊत यांना पिस्टल आणि काडतुसे खरेदी करायची होती. त्यासाठी त्यांनी सचिन मेश्राम नावाच्या व्यक्तीला पिस्टल विक्रेता शोधायला सांगितला. त्यानुसार त्याने पिस्टल विक्रेता शोधला आणि सागर बारमध्ये व्यवहार करण्यासाठी बोलावले. याची गुप्त माहिती पाचपावली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी छापा टाकला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून एका संशयिताला ताब्यात घेतले असल्याचे पाचपावली पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक मेश्राम यांनी सांगितले. यासंदर्भातील पुढील चौकशी पाचपावली पोलीस करत आहेत.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दीड लाख रुपयांची बॅग लंपास; घटना सीसीटीव्हीत कैद