नागपूर - शहरातील पाचपावली पोलिसांनी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. यामध्ये एका तडीपार गुंडाचा देखील समावेश आहे. त्यांच्याकडून धारदार शस्त्र व इतर साहित्य जप्त केले आहेत. दोन दिवसांपूर्वीही गुन्हे शाखेच्या पथकाने सहा आरोपींना अटक केली होती.
नाकाबंदीत सापडले अट्टल चोरटे
सध्या शहरात रात्रकालीन संचारबंदी असल्याने पोलीस विभागाकडून विविध चौकांत बंदोबस्त तैनात केलेला आहे. गस्तीदरम्यान पाचपावली पोलिसांच्या पथकाला एक संशयित कार दिसली. त्यानंतर पोलिसांनी त्या गाडीतील प्रवाशांची चौकशी केल्यास त्यात सहा प्रवासी बसलेले आढळले. पोलिसांनी त्यांना रात्री उशिरा बाहेर पडण्याचे कारण विचारले असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले. पोलिसांना संशय आल्याने पथकाने वाहनाची झडली घेतली. त्यावेळी वाहनात चाकू, तलवार व लुटपाट करण्यासाठीचे साहित्य आढळले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना तत्काळ अटक केली. सर्व आरोपी लुटपाट किंवा दरोडा टाकण्याच्या तयारीत होते, अशी माहिती पोलीस निरीक्षक किशोर नगराळे यांनी दिली आहे
अटकेतील आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार
पचपावली पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये अभिषेक उर्फ भांजा गुलाबे, विशाल मेश्राम, मोहित उर्फ डीजे, राजू सिंधू, पापा उर्फ गौरी नटके आणि अभिषेक उर्फ दत्त सिंग यांचा समावेश असून सर्व आरोपी नागपूर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. यापैकी अभिषेक उर्फ भांजा याला गेल्याच वर्षी पोलिसांनी तडीपार केले होते. तर विशाल मेश्राम विरोधात 10 गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पुढे आली आहे.
हेही वाचा - विदर्भात थंडीची तीव्रता घटली; नव्या वर्षात थंडीच्या पुनरागमनाची शक्यता
हेही वाचा - दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा बोलावता धनी वेगळा- गोविंददेव गिरी महाराज