ETV Bharat / state

Poddareshwar Ram Temple : शंभर वर्षांपासून हिंदू, मुस्लिम एक्याचं प्रतीक असलेले पोद्दारेश्वर राम मंदिर - पोद्दारेश्वर मंदिराच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण

सर्वधर्म समभावाचा संदेश देणारे नागपुरातील प्राचीन पोद्दारेश्वर राम मंदिराचा शंभर वर्षांचा ऐतिहासिक आणि गौरवपूर्ण प्रवास पूर्ण झाला आहे. मध्य भारतातील सर्वात मोठी शोभायात्रा म्हणून पोद्दारेश्वर राम मंदिराचा उल्लेख केला जातो. या शंभर वर्षात पोद्दारेश्वर राम मंदिराने सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा जोपासली आहे.

Poddareshwar Ram Temple
पोद्दारेश्वर राम मंदिर
author img

By

Published : Mar 28, 2023, 6:35 PM IST

Updated : Mar 28, 2023, 10:59 PM IST

सर्वधर्म समभावाचा संदेश देणारे पोद्दारेश्वर राम मंदिर

नागपूर : नागपुरातील प्राचीन पोद्दारेश्वर राम मंदिरात रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामाची भव्य शोभायात्रा निघते. त्यावेळी नागपुरातील मुस्लिम बांधव शोभायात्रेत केवळ सहभागी होत, नाही तर रामावर गुलाब पुष्पांची उधळण करतात. नागपूर हे सामाजिक ऐक्याचे प्रतीक असल्याचा संदेश ते देताता. पोद्दारेश्वर राम मंदिराच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण झाल्याने शतक महोत्सवी वर्ष साजरे केले जाते आहे. पोद्दारेश्वर राम मंदिर हे सर्वधर्म समभावाचे प्रतीक आहे. हिंदूसह मुस्लिमसह इतर धर्माचे नागरिक उत्सवात सहभागी होतात. पोद्दारेश्वर राम मंदिर हे केवळ नागपूरचे नव्हे तर, विदर्भाची सांस्कृतीक आणि धार्मिक ओळख आहे. मंदिराला शंभर वर्षांचा मोठा इतिहास आहे. एवढंच नाही तर मध्य भारतात प्रसिद्ध असलेल्या भव्य राम नवमीला निघणाऱ्या शोभायात्रेचा वारसा या मंदिराने जोपासला आहे.

पोद्दारेश्वर राम मंदिराचा इतिहास : ऐतिहासिक पोद्दारेश्वर राम मंदिर हे नागपुरच्या मुख्य रेल्वे स्थानकाच्या अगदी शेजारी आहे. नागपुरातील धार्मिक कुटुंबातील जमनाधार पोद्दार यांनी १९१९ साली स्वखर्चाने मंदिराच्या बांधकामास सुरुवात केली. तब्बल चार वर्षांनी म्हणजे १९२३ मध्ये मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर प्रभू राम, सीता आणि लक्ष्मणाच्या अतिशय सुंदर मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा जमनाधार पोद्दार यांच्या हस्ते झाला होता. त्यामुळेच या मंदिराला पोद्दारेश्वर राम मंदिर म्हणून ओळखले जाते. आज या घटनेला ९९ वर्षांचा ऐतिहासिक काळ पूर्ण झाला असून, मंदिराने १०० वर्ष पूर्ण केले आहे. १९५२ साली जमनाधार पोद्दार यांचे निधन झाल्यानंतर त्यांचा मुलगा रामकृष्ण पोद्दार आणि त्यांची मुलं मंदिराच्या सेवेत कार्यरत आहेत.

मंदिराची रचना : मंदिरात प्रवेश करताच उत्तराभिमुख भगवान श्रीराम, सीताराम आणि लक्ष्मणाची मूर्ती नजरेस पडते. मंदिराच्या उजव्या बाजूला शिवमंदिर आहे. या शिवाय मंदिरात हनुमान, विष्णू लक्ष्मी,गरुड,सुग्रीव, गंगा, महालक्ष्मीच्या मुर्त्या आहेत. जयपूरचे गोविंदराम उदयराम यांनी या मुर्त्या घडवल्या आहेत. याशिवाय अष्ठकोनी सभामंडप मंदिराची शोभा वाढवतो. पितळ आणि लाकडाचा वापर करून मंदिराचे द्वार तयार करण्यात आले आहे.

शोभायात्रेत मुस्लिम समुदायाचा सहभाग : पोद्दारेश्वर राम मंदिरातुन निघालेली शोभायात्रा मुस्लिम बहुल मोमीनपुरा याभागातून मार्गस्थ होते. त्यावेळी मुस्लिम धर्मियांकडून प्रभू राम, सीता आणि लक्ष्मणाच्या मूर्तीवर फुलांची मोठ्या प्रमाणात उधळण केली जाते. त्यामुळे नागपूरातून सर्वधर्मसमभावचा महत्वपूर्ण संदेश जगाला दिला जातो. त्यामुळेच या शोभायात्रेला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

हेही वाचा - Chaitra Navratri 2023 : चैत्र नवरात्रीच्या सहाव्या दिवशी केली जाते माता कात्यायनीची पूजा, मातेने केला होता महिषासुराचा वध

Last Updated : Mar 28, 2023, 10:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.