ETV Bharat / state

राज्यात इंधनदरवाढ सुरूच; नागपुरसह भंडाऱ्यातील पेट्रोलचे दर शंभरीपार - नागपूर इंधर दरवाढ बातमी

कोरोनामुळे आधीच नागरिक संकटात आहेत. अनेकांचे रोजगारे गेले. तर अनेकांचे उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. त्यात आणखी आता पेट्रोलचे दर वाढल्याने सर्वसामान्यांची दैना होत आहे. या पेट्रोल दरवाढीचा परिणाम वाहतूक क्षेत्रावर होणार आहे.

petrol price crossed 100 in nagpur
राज्यात इंधनदरवाढ सुरूच
author img

By

Published : May 29, 2021, 10:35 AM IST

Updated : May 29, 2021, 12:09 PM IST

नागपूर - राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून इंधन दरात वाढ होत आहे. उपराजधानी नागपुरातही पेट्रोल आणि डिझेलच्या दर वाढीने जवळपास शंभरी गाठली आहे. शुक्रवारी 99.82 पैसे पेट्रोलचे दर असताना केवळ 8 पैसे शंभरी गाठायला शिल्लक राहिले आहे. यात शनिवारी 25 पैसे पेट्रोलच्या दारात वाढ झाल्याने 100.07 वर पेट्रोलचे दर पोहोचले.

कोरोनामुळे आधीच नागरिक संकटात आहेत. अनेकांचे रोजगारे गेले. तर अनेकांचे उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. त्यात आणखी आता पेट्रोलचे दर वाढल्याने सर्वसामान्यांची दैना होत आहे. या पेट्रोल दरवाढीचा परिणाम वाहतूक क्षेत्रावर होणार आहे.

हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष: जाणून घ्या राज्यात खरीप पिकांचे नियोजन कसे?

मागील 9 दिवसात 1.04 रुपयाने वाढ -

नागपुरात 21 मेला पेट्रोलचा दर हा 99.21 होता. 23 मेला यात 16 पैशांची वाढ 99.37 होऊन झाली. यानंतर 25 मेला 22 पैशाने वाढ झाली होऊन दर 99.59 इतके झाले. 27 मेला या दरात 23 पैशाने वाढ होऊन दर 99.82 वर गेले. यानंतर आज (शनिवारी) दर 100.07वर पोहोचले आहेत. 21 मेपासून 29 मेपर्यंत 9 दिवसात 1.04 रुपयांनी पेट्रोलच्या दारात वाढ झाली आहे.

राज्यातील इतर ठिकाणचे पेट्रोलचे दर -

  • भंडारा - पेट्रोल - 104.13 रुपये, डिझेल - 94.53 रुपये
  • कोल्हापूर - पेट्रोल 100.14 रुपये, डिझेल - 90.40 रुपये
  • जळगाव - पेट्रोल 101.41 रुपये, डिझेल 91.93 रुपये (जळगावात आज पेट्रोलच्या दरामध्ये 25 तर डिझेलच्या दरामध्ये 29 पैशांनी वाढ झाली)
  • नाशिक - पेट्रोल 100.57 रुपये, डिझेल 91.12 रुपये
  • परभणी - पेट्रोल 102.82 रुपये, डिझेल 93.33 रुपये
  • पुणे - पेट्रोल 103.55 रुपये, डिझेल - 90.44

हेही वाचा - गेल्या वर्षाची जीएसटीची २४ हजार कोटींची भरपाई तातडीने मिळावी - अजित पवार

Last Updated : May 29, 2021, 12:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.