ETV Bharat / state

सलग दुसऱ्या दिवशी नागपुरात पेट्रोल डिझेलचा तुटवडा, वाहन चालकांनी संप मागे घेऊनही नागरिकांचे हाल

Shortage of petrol diesel : ट्रक आणि टँकर चालक असोसिएशन अंतर्गत येणाऱ्या चालकांच्या संपाचा नागपूरकरांना फटका बसला आहे. नागपुरात पेट्रोल व डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. नागपूर शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर सलग दुसऱ्या दिवशी वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र आहे.

Shortage of petrol diesel
सलग दुसऱ्या दिवशी नागपुरात परिस्थिती जैसे थे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 3, 2024, 11:05 AM IST

पेट्रोल डिझेलचा तुटवडा

नागपूर : Shortage of petrol diesel सलग दुसऱ्या दिवशीही नागपुरात पेट्रोल आणि डिझेलचा प्रचंड तुटवडा जाणवतो आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश पेट्रोल पंप हे ड्राय झाल्याची स्थिती निर्माण झालीय. पेट्रोल पंपांवर आज ही पेट्रोल उपलब्ध झालं नसल्यामुळं दुचाकी वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे. एकीकडे जिल्हा प्रशासनानं शहरात कुठही पेट्रोल-डिझेल व एलपीजी गॅसचा तुटवडा होणार नसल्याचा दावा केला होता. मात्र, आज सकाळीची परिस्थिती बघता जिल्हा प्रशासनानं केलेला दावा फोल ठरला आहे. आजदेखील नागरिकांना पेट्रोल डिझेल आणि गॅस सिलेंडरसाठी वणवण भटकंती करावी लागते आहे.

जिल्हा प्रशासनाचा दावा फोल : जनतेनं घाबरून जाऊ नये. नागपूर जिल्हयात मुबलक पेट्रोल डिझेल व गॅसचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचा दावा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकार यांनी केला होता. मात्र, आज देखील परिस्थिती 'जैसे थे' आहे. गरज पडल्यास पंप व पुरवठाधारकांनाही पोलीस संरक्षण देणार असंदेखील जिल्हाधिकारी म्हणाले होते. नागपूर जिल्ह्यामध्ये सर्व पेट्रोल पंपावर पुरेशा प्रमाणात पेट्रोल , डिझेल आणि गॅसचा साठा उपलब्ध आहे. याशिवाय पेट्रोल पंपांना पुरवठा करणाऱ्या डेपोमध्ये मुबलक साठा उपलब्ध आहे. गरज पडल्यास पोलीस संरक्षणात पेट्रोल पुरवण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी इंधन संपल्याच्या अफवावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

पोलीसांच्या सुरक्षेत गॅसचा ट्रक रवाना : पेट्रोल-डिझेलचा तुटवडा सलग दुसऱ्या दिवशी असल्यानं जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू शकतो. त्यामुळं शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यासंदर्भात जिल्हा प्रशासनासोबत पोलीस प्रशासनही सक्रिय झालं आहे. मंगळवारी रात्री उशिरा शहरात पोलिसांच्या सुरक्षेत गॅसचे ट्रक रवाना करण्यात आले. पोलीस वाहनांच्या गराड्यात गॅसचे ट्रॅक गॅस एजन्समध्ये पाठवण्यात आले आहेत. नागपूर शहरातील सगळ्याचं पेट्रोल पंपाला पोलीस सुरक्षा देणं शक्य नाही. मात्र, जिथे आवश्यक आहे तिथे पोलीस बंदोबस्त नेमण्यात येईल, असं आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिलंय.

हेही वाचा :

  1. टँकर चालकांच्या संपामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल; पाहा व्हिडिओ
  2. सरकारनं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नये-राष्ट्रीय ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशन
  3. ट्रक चालकांचा संपाचा ग्राहकांना फटका; नाशिक शहरातील 70 टक्के पंप ड्राय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.