नागपूर - आकाशगंगेत सोमवारी सायंकाळी एक अद्भुत खगोलीय घटना घडली. सूर्यमालेतील सगळ्यात मोठा ग्रह गुरू आणि शनी हे एकमेकांच्या अगदी जवळ आलेले होते. खगोलीय भाषेत या घटनेला 'ग्रेट जंक्शन' म्हटले जाते. सुमारे 400 वर्षांनंतर ही दुर्मीळ खगोलीय घटना घडली. ही विलक्षण घटना नागपूरकरांनी परावर्तित दुर्बिणीच्या माध्यमातून आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष अनुभवली.
रमण विज्ञान केंद्राच्यावतीने आयोजन
आकाशात दुर्मिळ क्षण 800 वर्षांनी गुरू आणि शनी ग्रह एकाच रेषेत इतक्या जवळ आले. खगोलीय दृष्टिकोनातून हा क्षण अभ्यासाच्या दृष्टिने महत्वाचा आहे. रमण विज्ञान केंद्राच्यावतीने नागपूरकरांना हा क्षण पाहता यावा म्हणून विशेष उपक्रम राबविण्यात आला. यासाठी चार दुर्बीण लावून गुरू आणि शनी एकाच रेषेत पाहता आले.
नागरिकांचा उदंड प्रतिसाद
गुरू आणि शनी सूर्याभोवती फिरतांना 12 वर्ष आणि 30 वर्ष घेतात. याच दरम्यान ते एका मागे दिसत असले तरी ते करोडो मैल एकमेकांपासून दूर असतात. पण पृथ्वीवरून वरच्या दिशेने आकाशात पाहतांना ते एकत्र दिसून येतात. दुर्बीणद्वारे हा क्षण अगदी जवळून पाहता आला. यावेळी गुरू आणि शनी ग्रहाचा लगतचे उपग्रहसुद्धा पाहता आले. हा क्षण काही तासच असल्याने हा दुर्लभ क्षण साठवून ठेवण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
२०८० मध्ये अनुभवता येणार दुर्मिळ क्षण
यंदाच्या वर्षात दोन ग्रहातील अंतर हे कमी म्हणजे 0.1 डिग्री इतके होते. हा दुर्मिळ क्षण अनुभवण्यासाठी आले होते पालक आपल्या लहान मुलांना घेऊन आले होते. आता २०८० मध्येच गुरु आणि शनीची अशा प्रकारे युती पाहता येणार आहे.