नागपूर - दिवाळीनिमित्त शहरातील बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. मात्र, कोरोना संकट कायम आहे. तरीही कोरोनाची पर्वा न करता, तसेच कुठलीही खबरदारी न बाळगता नागरिक बाजारात खरेदी करत असल्याचे दिसून येत आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील बर्डी बाजारपेठेसह इतर बाजारपेठांमध्ये तोबा गर्दी पाहायला मिळत आहे. यावेळी नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगचे पालन, मास्क न घालणे, या खबरदाऱ्या घेतल्या जात नसल्याचे दिसून आले आहे. एकीकडे प्रशासनाकडून कोरोना नियंत्रणासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. नियमांचे पालन करण्याकरिता वारंवार आवाहनही केले जात आहे. मात्र, नागरिक या आवाहनांकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे, कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता बळावली आहे.
हेही वाचा- बांबूपासून जैव इंधनावर विमान उड्डाणे सुरू करून दाखवतो - नितीन गडकरी