ETV Bharat / state

Chandrashekhar Bavankule : पुढील काळात आमचे विधानसभेतील संख्याबळ 164 वरुन 184 होईल -चंद्रशेखर बावनकुळे - Chandrasekhar Bawankule on Sanjay raut

पुढच्या दोन महिन्यांत राज्य सरकार कोसळेल आणि मध्यावधी निवडणुकांची घोषणा होईल असे भाकीत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. याला प्रत्युत्तर देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule on Sanjay raut) म्हणाले की, पुढील काळात आमचे विधानसभेतील संख्याबळ 164 वरुन 184 होईल.

Chandrashekhar Bavankule
चंद्रशेखर बावनकुळे
author img

By

Published : Nov 22, 2022, 3:58 PM IST

नागपूर: पुढच्या दोन महिन्यांत राज्य सरकार कोसळेल आणि मध्यावधी निवडणुकांची घोषणा होईल असे भाकीत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. याला प्रत्युत्तर देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule on Sanjay raut) म्हणाले की, पुढील काळात आमचे विधानसभेतील संख्याबळ 164 वरुन 184 होईल. किमान २० ते २५ आमदारांचा आम्हाला छुपा पाठिंबा आहे. त्यामुळे संजय राऊतांनी आता यावर अधिक काही बोलू नये. आमचे सरकार स्थिर आहे. सरकार पडण्याची कुठलीही शक्यता नाही. असं बावनकुळे म्हणाले.

राजकीय वादांत न पडता विकासाची कामे करू - बावनकुळे राज्यातील राजकीय स्थिती गोंधळलेली आहे. उद्या काहीही होऊ शकतं. त्यावर दोन महिन्यांत शिंदे-फडणवीस सरकार पडेल, असे संजय राऊत म्हणाले. याबाबत बोलताना आमदार बावनकुळे म्हणाले, राजकीय वादांत न पडता विकासाची कामे करू, असे दानवेंनी म्हटले आहे. राजकारणात उद्या काय होईल, हे कुणालाही सांगता येत नाही. नुकतेच आपण पाहिले की, उद्धव ठाकरेंच्या हुकूमशाहीला कंटाळून त्यांचे ५० आमदार बाहेर पडले आणि त्यांचे सरकार पडले. पण हे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल.

धमकी देणाऱ्याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस शोध घेणार (DCM Devendra Fadnavis) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिवे मारण्याची धमकी आलेली आहे. या संदर्भातील बातमी थोड्या वेळापूर्वीच बघितली. अशा धमक्यांना आम्ही भीक घातली नाही. केंद्र आणि राज्य सरकार दोघेही सक्षम आहेत. त्यामुळे अशी धमकी ज्यांनी दिली, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचा शोध घेतील, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले

राज्यपाल ज्या दिवशीपासून महाराष्ट्रात आले, तेव्हापासून त्यांनी संवेदनशिलपणे काम केले आहे. त्यांच्या रोजच्या बोलण्यामध्ये भाषणांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख (Governor on shivaji maharaj) असतो. ज्यांनी कधीही इतिहासाला आणि शिवरायांच्या प्रतिमेला धक्का लावण्याचा प्रयत्न केला नाही. भाजपचा कुठलाही कार्यकर्ता छत्रपती शिवरायांच्या इतिहासातून प्रेरणा घेऊन काम करतो. जगात त्यांचे स्थान कमी करू शकत नाहीत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.