नागपूर - विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची रणनीती ठरण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, संजय कुटे, सुरेश धस, महादेव जानकर, विनायक मेटे, बबनराव लोणीकर, प्रसाद लाड, रणजित पाटील आदी नेते सहभागी झाले होते.
१०५ आमदारांचा विरोधीपक्ष असल्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधी पक्षांनी कंबर कसलेली आहे. सरकारला विविध मोर्चावर घेण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली. या बैठकीत सरकारवर चौतर्फा हल्ले कसे केले जातील यावर रणनीती आखली गेल्याची माहिती मिळते आहे.
हेही वाचा - नागपूर: रबरी ट्यूबमध्ये भरलेली दोन हजार लिटर मोहफुलाची दारू जप्त
हेही वाचा - नागपूर हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच भाजप आक्रमक