नागपूर - महाराष्ट्रात गाजत असलेल्या सचिन वाझे प्रकरणात वाझेचे कथित पत्र हे व्हायरल झाले आहे. हे पत्र सर्वांना विचार करायला भाग पडणारे असल्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणणे आहे. या पत्रातील मजकूर महाराष्ट्र व पोलिसांच्या प्रतिमेसाठी चांगला नाही. जे सत्य आहे ते पुढे आले पाहिजे, असेही ते म्हणाले. ते नागपूर विमानतळात माध्यमांशी बोलत होते.
अनिल देशमुख यांच्या प्रकरणात उच्च न्याल्याच्या चौकशीचे आदेश दिले आहे. सीबीआयने चौकशी सुरू केली आहे. या चौकशीतून सत्य बाहेर येईल. यात जे पोलिसांच्या तपासत आलेले पत्र असो की काही खुलासे याची सखोल चौकशी झाली पाहिजे. यात जे जावाब नोंदवण्यात आले आहेत. त्याचीही चौकशी होऊन सत्य बाहेर आले पाहिजे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
रेमडीसिवीरचा काळाबाजार रोखण्यासाठी कडक करवाई राज्यसरकारने करणे गरजेचे
सरकारने रेमडीसिवीर संदर्भात लक्ष देणे गरजेचे झाले आहे. याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. मागील वेळीही काळाबाजार झाला होता. पण, यावेळी कोरोनाची दुसरी लाट आणि गंभीर परिणाम हे मोजक्याच राज्यात दिसून येत आहे. यामुळे ज्या राज्यात कोरोनाची परिस्थिती अधिक भयावह नाही. त्या ठिकाणावरून रेमडिसीव्हरचा साठा मागवता येईल का याचीही चाचपणी केली पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले. रेमडिसीवीर औषध निर्माण करणाऱ्या कंपन्यांकडून साठा मिळवण्यासाठी प्रयत्न केले आहे. यासोबतच औषधीचा काळाबाजार होणार नाही. यासाठी कडक पाऊले उचलत कठोर काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करणेही गरजेचे असल्याचे विरोधीपक्ष नेते फडणवीस म्हणाले.
कडक निर्बंधाच्या नावाखाली झाली फसवणूक
सरकारने कडक निर्बंधांचे नावाखाली लॉकडाऊन केले आहे. सुरुवातीला दोन दिवस सांगण्यात आले होते. सरकारने निर्णय घेण्यापूर्वी सर्वच व्यापारी वर्गातील गटांशी बोलून यात त्याचाही प्रश्न सुटेल आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता येईल, असा मार्ग काढायला पाहिजे होता. पण, दोन दिवसांचा लॉकडाऊन सांगत संपूर्ण दिवस लॉकडाऊन केल्याने फसवणूक झाल्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे.
समनव्यातून मार्ग काढताना दिसत नाही
हा उद्रेक होणे तो योग्य नाही. समाज आणि सरकार यांच्यात समन्वय साधायला पाहिजे. यात वेळ पडल्यास दोन पाऊले मागे सरकत समजुतीने निर्णय झाले पाहिजे. पण, असे होताना दिसत नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
लसीकरणाच्या नावावर राजकारण बंद करा
महाराष्ट्र सरकारने लसीचे राजकारण बंद करत नागरिकांच्या जीवाशी खेळणे बंद केले पाहिले, अशी टीका विरोधीपक्षानेते फडणवीस यांनी केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यानी महाराष्ट्राला किती लस दिल्यात किती लावण्यात आल्या आहे हे स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रात टीका करणाऱ्यांनी हे समजले पाहिजे की उत्तर प्रदेश सारख्या दुप्पट लोकसंख्या असणाऱ्या राज्यांपेक्षा जास्त लसीचा पुरवठा महाराष्ट्राला मिळाला आहे. यामुळे हे राजकारण बंद करावे, असेही फडणवीस म्हणाले.
हेही वाचा - नागपुरात कोरोना परिस्थिती गंभीर; इमारतीतील रहिवासियांवर कडक निर्बंध
हेही वाचा - श्रद्धानंद अनाथालयातील विद्यार्थिनींच्या निश्चयाची 'गुढी'