सभागृहासह न्यायालयाचा मुख्यमंत्र्यांकडून अपमान कोणताही मंत्री अपील घेताना संबंधित बाबींची नस्ती तपासूनच अपील घेतो. यावरून मुख्यमंत्री Ambadas Danve Demand Cm Eknath shinde Resign यांनी खोटी माहिती देऊन सभागृह व न्यायालयाचा अपमान व दिशाभूल केली आहे. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून ते दबाव आणू शकतात. त्यामुळे त्यांनी राजीनामा देणे गरजेचे आहे, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली. सदर प्रकरण न्याय प्रविष्ट असतानाही तत्कालीन नगरविकास मंत्री यांनी हस्तक्षेप केल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले ही गंभीर बाब आहे. एकनाथ शिंदे यांच्या भ्रष्टाचारावर Land Scam Allegation On Eknath Shinde उच्च न्यायालयाने Mumbai High Court ठपका ठेवल्याचे अंबादास दानवे यांनी म्हटले.
अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांचे फोन रेकॉर्ड तपासा या प्रकरणात तत्कालीन सभापती दीपक म्हैसेकर, अश्विन मुदगळ, शीतल तेली उगले व मनोजकुमार सूर्यवंशी या चार अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांचे फोन रेकॉर्ड तपासले पाहिजे, अशी मागणी दानवे Ambadas Danve Demand Cm Eknath shinde Resign यांनी केली. या प्रकरणात २ अधिकारी हे आयएस आहेत. त्यामुळे त्यांनी तत्कालीन नगरविकास मंत्री Cm Eknath shinde Nagpur Land Scam Case यांना माहिती दिली नव्हती का याबाबतही चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, असे दानवे यांनी म्हटले.
साडेचार एकर जमिनीचा ताबा नागपूर सुधार प्रन्यास प्राधिकरणाकडे नागपूर सुधार प्रन्यास हे प्राधिकरण नगर विकास विभागाच्या अधिनस्थ आहे. मौजे हरपूर येथील साडेचार एकर जमिनीचा ताबा नागपूर सुधार प्रन्यास प्राधिकरण यांच्याकडे होता. यासंदर्भात हरपूरच्या भूखंड क्रमांक ९,१०, ११, १२ व १६/२ याबाबत उच्च न्यायालय नागपूर बेंच येथे रिट पिटीशन क्रमांक २२२७० च्या २००४ ही याचिका न्यायप्रविष्ट होती.
तत्कालीन सभापतींचा भूखंड देण्यासाठी नकार नागपूर सुधार प्रन्यास सभापती दीपक म्हैसकर यांनी १७९८६ चौरस मीटर या भूखंडाबाबत गुंठेवारीच्या नियमानुसार आदेश पारित केले होते. परंतु सदर एनआयटीचा भूखंड Ambadas Danve Demand Cm Eknath shinde Resign हा गुंठेवारीमध्ये येत नसल्याने ते आदेश नियमबाह्य करण्यात आले. तत्कालीन सभापती यांनी हा भूखंड देण्यासाठी नकार दिलेला असतानाही तत्कालीन नगरविकास मंत्री Cm Eknath shinde Nagpur Land Scam Case यांनी दिनांक २० एप्रिल २०२१ रोजी अपील घेऊन अंदाजे ८३ कोटी रुपये किंमतीचा हा भूखंड १६ बिल्डरांना २ कोटी रुपयांना भाडेतत्त्वावर देण्यासाठी आदेश दिल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले.