मुंबई : हिवाळी अधिवशेनाच्या ( Winter Session in Nagpur ) दुसऱ्या दिवशी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले असताना, विधानसभेतील साऊंड सिस्टम पूर्णतः बंद ( shutting down the sound system in Vidhan Bhavan ) पडली. विधानसभेचे कामकाज यामुले गुंडाळावे लागले. राज्याचे विधानसभा विरोधीपक्षनेते विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावरुन सरकारवर निशाणा ( Opposition leader Ajit Pawar critics on Government ) साधला. कोट्यवधीचा खर्च करुन साऊंड सिस्टममुळे विधीमंडळाचे कामकाज थांबवावे लागत असेल तर हे सरकारचे मोठे अपयश आहे, अशी जोरदार टीका पवार यांनी केली. शासनाच्या कार्यपध्दतीवरही त्यांनी यावेळी तोफ डागली.
साऊंड सिस्टम पडली बंद : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ( Winter Session in Nagpur ) नागपूरला होत आहे. दोन आठवड्यांच्या या अधिवेशनात विरोधक आक्रमक झाले आहेत. सत्ताधाऱ्यांवर टीकेची एकही संधी विरोधक सोडताना दिसत नाहीत. अधिवेशनच्या दुसऱ्या दिवशी विधीमंडळाच्या पायऱ्यांवरील घोषणाबाजी नंतर सकाळच्या सत्रात न्यायालयाने मुख्यमंत्र्यांकडून झालेल्या भूखंड विक्रीवर केलेल्या टीपण्णींचे तीव्र पडसाद सभागृहात उमटले. आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी सुरु असताना, अचानक साऊंड सिस्टम बंद पडली. सभागृहाचे कामकाज आटपावे लागले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावरुन सरकारच्या कार्यपध्दतीवर सडकून टीका केली.
राज्य सरकारचे मोठे अपयश : राज्याचे विधानसभा विरोधीपक्षनेते अजित पवार सांगितले की, विधीमंडळाच्या कामकाजावर कोट्यवधी रुपये खर्च होत असतात. विधीमंडळ सदस्य आपला अमूल्य वेळ कामकाजासाठी देत असतो. राज्यातील जनतेचे लक्ष कामकाजाकडे लागलेले असते. कामकाजातील प्रत्येक मिनिट महत्वाचे असते. विधीमंडळाचा वेळ वाया जावू नये म्हणून विरोधी पक्ष संपूर्ण सहकार्य करत असताना, ध्वनिक्षेपक यंत्रणा बंद पडल्याने सभागृहाचे कामकाज थांबवावे लागणे योग्य नाही. ज्या यंत्रणेवर ही जबाबदारी आहे ती यंत्रणा आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरली आहे. ध्वनीक्षेपक यंत्रणा वारंवार बंद पडणे आणि त्यामुळे सभागृहाचे कामकाज थांबवावे लागणे, हे सरकारचेही अपयश आहे. या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध करतो, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले. तसेच सरकारच्या कार्यपध्दतीवर संताप व्यक्त केला.