नागपूर - विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपुरात सुरू आहे. गुरूवारी या अधिवेशनाचा चौथा दिवस आहे, मात्र आज सलग चौथ्या दिवशीही विरोधक विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन करत आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रूपये मदत करणार, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र ते आपले वचन विसरले असून जनतेची फसवणूक करत असल्याची टीका आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे.
हेही वाचा... मी पवारसाहेबांचे ऐकले, कारण....
आज गुरूवारी महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. मात्र आज चौथ्या दिवशी सुद्धा भारतीय जनता पक्षाचा नेतृत्वात विधानसभेत विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजारांची मदत करणार, असे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी गेल्या 4 दिवसांपासून विरोधक आंदोलन करत आहेत. आज गुरूवारी देखील विरोधक विधानसभेच्या पायऱ्यांवर यासाठी आंदोलन करताना दिसत आहे.
हेही वाचा... नियंत्रण रेषेवर कधीही बिघडू शकते परिस्थिती, आम्ही तयार - लष्करप्रमुख बिपिन रावत
घोषणा करूनही मदत न देणे हि बेईमानी - बबनराव लोणीकर
राज्यातील या सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन, शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रूपये मदत करणार, असे आश्वासन दिले होते. मात्र, सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांना आपल्या वचनाचा विसर पडला आहे. ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे. तसेच जनतेसोबत केलेली बेईमानी आहे, अशा शब्दात भाजप नेते आणि आमदार बबनराव लोणीकर यांनी सरकारवर टीका केली.