ETV Bharat / state

Truck Bike Accident Nagpur : भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; एका विद्यार्थीचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी - नागपूर कामठी अपघात

नागपुरातील भिलगाव शिवारात ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींवर उपचार सुरु आहे.

अपघातातील दुचाकी
अपघातातील दुचाकी
author img

By

Published : Mar 4, 2022, 8:24 PM IST

नागपूर - नागपूर कामठी मार्गावरील भीषण अपघात झाला आहे. भिलगाव शिवारात ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्यामुळे एका शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर दोन गंभीर जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना कामठी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिघे विद्यार्थी एका दुचाकीने जात असताना विरुद्ध दिशेने आलेल्या ट्रकने मोटरसायकलला जबर धडक दिली. ज्यात एकाच घटना स्थळीच मृत्यू झाला आहे. दिशांत पटले (१७) असे मृत झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. अपघातास कारणीभूत ट्रकचालकाला यशोधरा पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार तीन शालेय विद्यार्थी हे निशांत पटलेच्या मोटारसायकलने कामठी मार्ग भिलगाव येथे जात होते. त्याचवेळी गाडीने रस्त्या क्रॉस करत असताना भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. ज्यामध्ये तीनही विद्यार्थी जखमी झाले होते. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केले असता निशांत पटलेला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर आरव चौधरी आणि मयंक महेशकुमार सिंग गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

मृतक आणि जखमी 10 वीचे विद्यार्थी

निशांत महादेव पटले, आरव चौधरी आणि मयंक महेशकुमार सिंग या तीनही विद्यार्थ्यांचे वय 17 वर्ष असून ते कामठी येथील आर्मी पब्लिक स्कूलचे विद्यार्थी आहेत.

हेही वाचा - Nagpur Crime News : तलवारीच्या धाकाने व्यवस्थापकाला 3 लाखांना लुटले; पोलिसांनी 12 तासांत पकडले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.