ETV Bharat / state

नागपुरात काँग्रेसच्या आंदोलनात बॅनर जाळताना पोलीस कर्मचाऱ्याला इजा - नागपूर कॉंग्रेस आंदोलन

पोलीस कर्मचारी बॅनर हिसकावत असतानाच अचानक काँग्रेस कार्यकर्त्यांनी बॅनरला आग लावल्याने पेट घेत भडका उडाला. यावेळी येथे कार्यरत असलेल्या गणेश पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार दादाराव जांभुळकर भाजले असून त्यांच्या डोळ्याला इजा झाल्याची माहिती आहे. वेळीच पोलीस कर्मचाऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कॉग्रेस आंदोलन
कॉग्रेस आंदोलन
author img

By

Published : May 30, 2021, 5:46 PM IST

नागपूर - काँग्रेसच्या वतीने मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण होत असल्याने निषेध आंदोलन करण्यात आले. मात्र यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोदींचा बॅनर जाळण्याचा प्रयत्न करत असताना पेटवलेला बॅनर ओढून घेतांना पोलीस हवालदाराच्या डोळ्याला इजा झाल्याची घटना घडली. नागपुरच्या काँग्रेस कार्यालयासमोर हा प्रकार घडला. दादाराव जांभुळकर असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

असा घडला प्रकार

नागपूर शहर काँग्रेसच्या देवडिया भवन या मुख्य कार्यालयासमोर काँग्रेसचे कार्यकर्ते मोदी सरकारचे सात वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विरोध प्रदर्शन करत होते. आमदार विकास ठाकरे आणि आमदार अभिजित वंजारी यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन होत असताना काँग्रेस कार्यकर्त्यांने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रावनरुपी असलेले एक बॅनर जाळण्यासाठी बाहेर काढला. यावेंळी हा बॅनर पोलिसांना दिसताच पोलीस धावून गेले. त्याठिकाणी उपस्थित असलेल्या पोलिसांनी रस्त्याच्यामध्ये जाळपोळ करता येणार नाही, असे सांगत काँग्रेस कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत बॅनरची ओढतान सुरू केली. दरम्यान पोलीस कर्मचारी बॅनर हिसकावत असतानाच अचानक काँग्रेस कार्यकर्त्यांनी बॅनरला आग लावल्याने पेट घेत भडका उडाला. यावेळी येथे कार्यरत असलेल्या गणेश पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार दादाराव जांभुळकर भाजले असून त्यांच्या डोळ्याला इजा झाल्याची माहिती आहे. वेळीच पोलीस कर्मचाऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा- गंगेच्या पात्रात शव वाहण्याचे पाप मोदी सरकारचेच, बाळासाहेब थोरातांचा भाजपवर हल्ला बोल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.