नागपूर - उपराजधानी नागपुरात आणखी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. मोमीनपुरा परिसरातला एका 52 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याचे चाचणीमध्ये समोर आले. हा रुग्ण काही दिवसांपासून आमदार निवासात क्वॉरेंटाईन होता. दिल्लीच्या निजामुद्दीन येथील मरकजवरुन परतलेल्या जबलपूरयेथील काही कोरोना संक्रमित रुग्णांच्या संपर्कात तो आला होता.
नागपूर शहरातील कोरोना हॉटस्पॉट पैकी एक असलेल्या मोमीनपुरा भागात हा रुग्ण राहतो. नव्याने आढळलेल्या या रुग्णामुळे नागपुरात कोरोनाबाधित रुग्ण संख्या 99 झाली आहे. आत्तापर्यंत 15 रुग्णांनी कोरोनवर मात केली आहे. सध्या ८४ रुग्णांवर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत.