ETV Bharat / state

OBC Reservation : ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन, भाजपच्या भूमिकेविरुद्ध राष्ट्रीय ओबीसी महासंघ - ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून फूट पडल्याचे दिसत आहे. कारण, भाजपने ओबीसी राजकीय आरक्षणासाठी आंदोलन केले. मात्र, राष्ट्रीय ओबीसी महासंघानेही आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपच्या विरोधात भूमिका घेत शेजारीच वेगळी चूल मांडल्याचे दिसले. भाजपने ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारला जबाबदार धरले. तर राष्ट्रीय ओबीसी महासंघाने ओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकारला जबाबदार धरले.

राष्ट्रीय ओबीसी महासंघ
राष्ट्रीय ओबीसी महासंघ
author img

By

Published : Sep 4, 2021, 7:28 AM IST

नागपूर : भारतीय जनता पक्षाकडून ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या विषयावर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात इतर ओबीसी संघटनांप्रमाणे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील सहभागी झाले होते. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण हिरावण्यासाठी राज्य सरकारंच जबाबदार असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला. मात्र, भाजपची भूमिका राष्ट्रीय ओबीसी महासंघाला मुळीच पटलेली दिसत नाही. भाजपच्या भूमिके विरोधात त्यांनी भूमिका घेत ओबीसी समाजाला आरक्षण मिळण्यासाठी होत असलेल्या विलंबासाठी केंद्र सरकार जबाबदार असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने उभे केलेल्या ओबीसी आंदोलनातं फूट पडल्याचे दिसून येत आहे. भाजपचे नेते आणि कार्यकर्ते आंदोलन करत होते. त्यापासून काही अंतर राखत राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आंदोलन केले.

राष्ट्रीय ओबीसी महासंघ

ओबीसी आरक्षण जायाला राज्य सरकार जबाबदार - भाजप

ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण गेल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी समाजाला राजकीय आरक्षणापासून मुकावे लागले, असा आरोप केला जात आहे. या विषयाला ओबीसी समाजाच्या अस्मितेचा मुद्दा मानून गेल्या काही महिन्यांपासून भारतीय जनता पक्ष आंदोलनाच्या भूमिकेत आहेत. यासाठी सर्व ओबीसी समाजातील संघटनांनी मोट बांधून एक मोठं आंदोलन उभं करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. यामध्ये सर्वात मोठी संघटना म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघ देखील या मागणीच्या अनुषंगाने भाजपच्या बरोबर आंदोलन करत आहे.

राष्ट्रीय ओबीसी महासंघ भाजप विरोधात

काल (3 सप्टेंबर) भारतीय जनता पक्षातर्फे नागपूर संविधान चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. भाजपचे आंदोलन सुरू होते. त्या स्थळाच्या काही अंतरावर राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या कार्यकर्त्यांनी आपली वेगळी चूल मांडली. त्या ठिकाणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या कार्यकर्त्यांनी सुभाष घाटे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करत आंदोलन केले.

केंद्राने तीन मागण्या तत्काळ मान्य कराव्या - घाटे

ओबीसी समाजाची जनगणना तत्काळ करण्यात यावी, अशी पहिली मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून करण्यात आली आहे. ओबीसी समाजाला संख्येनुसार आरक्षण देण्यात यावे. तत्काळ केंद्राने ओबीसी मंत्रालयाची स्थापना करावी, अशी मागणी घाटे यांनी केली आहे.

ओबीसीच्या विषयावर राजकारण तेजीत -

ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण गेल्यानंतर सर्व प्रमुख पक्षांकडून राजकारण केले जात असल्याचा आरोप सुभाष घाटे यांनी केला आहे. यामध्ये सत्ताधाऱ्यांसह विरोधक देखील आघाडीवर असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा - दिल्लीत आंदोलनाला बसलेले शेतकरी जास्त शहाणे आहेत का?, चंद्रकांत पाटलांची जीभ घसरली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.