ETV Bharat / state

इंग्लंडहून नागपुरात आलेल्या कोरोना रुग्णांची संख्या ४; नव्या स्ट्रेनच्या अहवालाची प्रतिक्षा

नव्या कोरोना स्ट्रेनची भीती वाढत असताना नागपुरात संशयित रुग्णांची संख्या वाढत आहे. इंग्लंडहून नागपुरात आलेल्या रुग्णांची संख्या आता चार झाली आहे. यात 28 वर्षीय तरुणाचा पुणे येथून अहवाल प्रतिक्षेत असताना आज नव्याने तीन कोरोना रुग्णांचे स्वॅब नव्या कोरोना स्ट्रेनची ओळख पटवण्यासाठी पुण्यातील एनआयव्हीला (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी) पाठवण्यात आले आहे.

Corona positive patient Nagpur
शासकीय रुग्णालय नागपूर
author img

By

Published : Dec 26, 2020, 8:57 PM IST

नागपूर - नव्या कोरोना स्ट्रेनची भीती वाढत असताना नागपुरात संशयित रुग्णांची संख्या वाढत आहे. इंग्लंडहून नागपुरात आलेल्या रुग्णांची संख्या आता चार झाली आहे. यात 28 वर्षीय तरुणाचा पुणे येथून अहवाल प्रतिक्षेत असताना आज नव्याने तीन कोरोना रुग्णांचे स्वॅब नव्या कोरोना स्ट्रेनची ओळख पटवण्यासाठी पुण्यातील एनआयव्हीला (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी) पाठवण्यात आले आहे.

माहिती देताना मनपातील वैदकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार

हेही वाचा - नागपूर : कार आणि ट्रेलरचा भीषण अपघात; चौघांचा घटनास्थळीच मृत्यू, एक जखमी

नागपुरात इंग्लंड प्रवासाची पार्श्वभूमी असणारा पहिला रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली होती. त्यातच शुक्रवारी (२५ डिसेंबर) एक महिला आणि मुलगी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली. त्यात आज पुन्हा एका युवकाची भर पडली आहे. खबरदारी म्हणून हा रुग्ण स्वतःहून समोर आला असल्याचे बोलले जात आहे. या रुग्णांना मेडिकल कॉलेजमध्ये वेगळ्या वॉर्डात विलगिकृत करण्यात आले आहे.

स्ट्रेनचा अहवाल येईपर्यंत भीती कायम

खबरदारी म्हणून रुग्णांचे नमुने पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीला पाठवण्यात आले आहेत. जोपर्यंत अहवाल येत नाही तो पर्यंत हे रुग्ण नवीन कोरोना स्ट्रेनचे आहेत की नाही, याची पुष्टी होणार नाही. सर्व स्पष्ट झाल्यावरच भीती कमी होण्यास मदत होईल.

हेही वाचा - नागपूर : नाताळ सणावर कोरोनाचे सावट; साधेपणाने साजरा करण्यात आला येशूंचा जन्मसोहळा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.