ETV Bharat / state

कुख्यात गुंड नितीन कुलमेथे उर्फ नित्याची निर्घृण हत्या; दोन जणांना अटक

संध्याकाळी नित्या त्याच्या घराबाहेर बसला असताना आरोपी पंकज राऊत आणि मंगेश सोनवणे या दोघांनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. नित्या खबरी झाल्याच्या संशयावरून त्याची हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

घटनेचे छायाचित्र
author img

By

Published : Jul 9, 2019, 11:36 AM IST

नागपूर- शहरातील तकीया धंतोली परिसरात कुख्यात गुंड नित्या उर्फ नितीन कुलमेथे याची सोमवारी निर्घृण हत्या झाली. मृत नित्या पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून त्याच्याच दोन मित्रांनी त्याची निर्घृण हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणातील आरोपी पंकज राऊत आणि मंगेश सोनवणे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

घटनेबद्दल माहिती देताना पोलीस अधिकारी

संध्याकाळी नित्या त्याच्या घराबाहेर बसला असताना आरोपी पंकज राऊत आणि मंगेश सोनवणे या दोघांनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात नित्या गंभीर जखमी झाला होता. अचानक झालेल्या हल्ल्यातून सावरत त्याने पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या घराच्या काही अंतरावरच आरोपींनी त्याला पुन्हा गाठून त्याची निर्घृण हत्या केली. घटनेची माहिती मिळताच धंतोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलीस उपायुक्त चिन्मय पंडितदेखील घटनास्थळी आले. त्यानंतर मृतक हा कुख्यात गुंड नितीन उर्फ नित्या असल्याचे निष्पन्न होताच पोलिसांनी मारेकऱ्यांना शोधण्यास सुरूवात केली. या प्रकरणी पोलिसांनी पंकज राऊत आणि मंगेश सोनवणे या मारेकऱ्यांना अटक केली आहे.

नित्या हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार होता. त्याच्यावर १९९५ ते २००९ या काळात अनेक गंभीर गुन्हे धंतोली पोलीस ठाण्यासह अन्य पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. २००९ नंतर तो कुटुंबासह पंढरपूर येथे स्थायिक झाला होता. मात्र, त्याचे एक घर तकीया धंतोली परिसरात असल्याने तो अधून-मधून तेथे राहायला यायचा. गेल्या दोन महिन्यांपासून तो इथेच राहत असल्याची माहितीदेखील तपासातून समोर आली आहे. नित्या हा पोलिसांचा खबरी असल्याच्या संशय आरोपींना होता. आरोपींसंदर्भांतील माहिती तो पोलिसांना पुरवत असल्याच्या संशयावरून आरोपींनी त्याचा खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Intro:नागपूरच्या तकीया धंतोली परिसरात कुख्यात गुंड नितीन उर्फ नित्या कुलमेथे याची निर्घृण हत्या झाली आहे....मृतक नित्या हा पोलिसांचा खबरी असल्याचा संशयावरून त्याच्याच दोन मित्रांनी त्याची निर्घृण हत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे...या प्रकरणातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे Body:संध्याकाळी नित्या हा त्याच्या घराबाहेर बसला असताना आरोपी पंकज राऊत आणि मंगेश सोनवणे या दोघांनी त्याच्यावर धारधार शस्त्रानी हल्ला केला,ज्यामध्ये नित्या हा गंभीर जखमी झाला होता...अचानक झालेल्या हल्ल्यातून सावरत त्याने पळण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्या घराच्या काही अंतरावर आरोपींनी त्याला पुन्हा गाठून त्याची निर्घृण हत्या केली...ही घटना दाटीवाटीच्या तकीया धंतोली परिसरात घडली आहे....घटनेची माहिती समजताच धंतोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले होते....त्यानंतर पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित देखील घटना स्थळी आले होते.... मृतक हा कुख्यात गुंड नितीन उर्फ नित्या असल्याचे निष्पन्न होताच पोलिसांनी त्याच्या दोन मारेकऱ्यांना अटक केली आहे,ज्यामध्ये पंकज राऊत आणि मंगेश सोनवणे या दोघांना समावेश आहे...नित्या हा देखील पोलिसांच्या रेकॉर्ड वरील गुन्हेगार होता....त्याच्यावर 1995 ते 2009 या काळात अनेक गुन्हे धंतोली पोलीस स्टेशन सह अन्य पोलीस स्टेशनमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत....2009 नंतर तो कुटुंबासह पंढरपूर येथे स्थायिक झाला होता, मात्र एक घर तकीया धंतोली परिसरात असल्याने तो अधून मधून तेथे राहायला यायचा,गेल्या दोन महिन्यांपासून तो इथेच राहत असल्याची माहिती देखील समोर आली आहे....नित्या हा पोलिसांचा खबर्या असल्याचा संशय आरोपींना होता,आरोपींच्या संदर्भांतील माहिती तो पोलिसांना पुरवत असल्याचा संशय देखील त्यांना होता,त्याचाच वचपा काढण्यासाठी आरोपींची नित्याचा काटा काढला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.