नागपूर - राज्यभर विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाला आहे. उमेदवार आपापल्या मतदारसंघात जाऊन मतदारांच्या भेटी घेत आहेत. काही ठिकाणी मात्र उमेदवारांना नागरिकांच्या रोषाला समोर जावे लागत आहे.
नागपूरमध्येही सध्या राजकीय वातावरण तापलेले आहे. उत्तर नागपूर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर मिलिंद माने प्रचारासाठी मतदारसंघात गेले असता, त्यांना नागरिकांच्या रागाचा सामना करावा लागला.
हेही वाचा - ...म्हणून निवडणुकीच्या प्रचार साहित्यांची मागणी घटली
डॉ. माने उत्तर नागपूरचे विद्यमान आमदार (भाजप) आहेत. मागील पाच वर्षांच्या विकास कामाचा आलेख लक्षात घेता मानेंची कामगीरी नागरिकांना रूचलेली नाही. त्यांनी मतदार संघातील समस्या सोडवल्या नसल्याने नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला. आगामी निवडणूक प्रचारासाठी आलेल्या मिलिंद माने यांना नागरिकांनी गोंधळ घालत परत पाठवले.