नागपूर - येत्या विधानसभा निवडणुकीसाठी बनवण्यात आलेल्या पक्षाच्या स्क्रिनिंग कमिटीमध्ये माझे नाव नाही हे राजकारण आहे, असा आरोप काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. मात्र, आपल्या मनातील खदखद व्यक्त करत आपण नाराज नसल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले आहे.
महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे स्क्रिनिंग कमिटी जाहीर करण्यात आली. मात्र, या स्क्रिनिंग कमिटीमध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते व पक्षाचे जेष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांचे नाव वगळण्यात आले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. तर या कमिटीत नाव वगळल्याने खुद्द विजय वडेट्टीवार यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
यापूर्वी स्क्रिनिंग कमिटीतदेखील विरोधी पक्ष नेत्यांचे नाव असायचे. मात्र, यावेळी तसे झाले नाही. तर या समितीत माझे नाव नाही हे राजकारण आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच मला महाराष्ट्रातील मतदारसंघातील माहिती आहे त्यामुळे नाव या कमिटीमध्ये असणे गरजेचे होते, अशी आपल्या मनातील खदखद त्यांनी व्यक्त केली. मात्र, ते नाराज नाहीत असे स्पष्टीकरणदेखील त्यांनी यावेळी दिले आहे.