ETV Bharat / state

नागपुरात नितीन विरुद्ध नितीन, रंगला शाब्दिक सामना - Nagpur latest news

आमचे सरकार असताना देवेंद्र फडणवीस हे नागपूर-विदर्भाचे प्रतिनिधित्व करत होते. पण आता काँग्रेसचे नितीन राऊत, सुनील केदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख हे सरकारमध्ये नागपूर-विदर्भाचे प्रतिनिधी आहेत. नागपूरचे-विदर्भाचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. आम्ही कुठलेही राजकारण न करता, त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहू, असे गडकरी यांनी सांगितले.

Nitin Raut Criticize Nitin Gadkari
नितीन विरुद्ध नितीन
author img

By

Published : Jan 29, 2020, 10:53 AM IST

नागपूर - महामेट्रो लाईनच्या उद्घाटनादरम्यान राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी भाषण करताना मंचावर बसलेल्या नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांना चिमटे काढण्याचा प्रयत्न केला. यावर बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील जोरदार टीका केली.

नागपुरात नितीन विरुद्ध नितीन

राऊत यांनी महामेट्रो माझ्याच आग्रहामुळे झाल्याचे झाल्याचे सांगितले. तर फडणवीस आणि नितीन गडकरी यांनी गेल्या 5 वर्षात किती रोजगार मिळवून दिले? असा सवालही केला. तर यावर श्रेयावादाच्या यादीत माजी मंत्री विलास मुत्तेमवार यांचेही नाव समाविष्ट करून टाका. कारण, त्यांचाही दावा आहे की, मेट्रो त्यांच्यामुळेच नागपुरात आली आहे, असा टोला गडकरी यांनी लगावला.

रोजगाराच्या प्रश्नावरही गडकरी यांनी 23 हजार तरुणांना रोजगार मिळाल्याचा दावा केला. त्यामुळे या 2 नेत्यांच्या जुगलबंदीमुळे या कार्यक्रमाला राजकीय रंग चढल्याचे बघायला मिळाले.

Intro:महामेट्रो ऍक्वा लाईनच्या उदघाटना दरम्यान राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपुरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी भाषण करताना मंचावर बसलेल्या नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांना चिमटे काढण्याचा प्रयत्न केला...महामेट्रो माझ्याच आग्रहामुळे झाल्याचे झाल्याचे सांगताना नितीन राऊत यांनी फडणवीस आणि नितीन गडकरी यांनी गेल्या पाच वर्षात किती रोजगार मिळवून दिले याचा हिशोबच मागून टाकला...यावर बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील नितीन राऊत यांच्या गुगलीवर जोरदार षटकार खेचला...श्रेयावादाच्या यादीत माजी मंत्री विलास मुत्तेमवार यांचेही नाव समाविष्ट करून टाका,करण त्यांचा दावा आहे की मेट्रो त्यांच्यामुळेच नागपुरात आलेली आहे...रोजगाराच्या प्रश्नावरही त्यांनी नितीन राऊत यांच्या प्रश्नावर बेधडक उत्तर देत मिहान मध्ये 23 हजार तरुणांना रोजगार मिळाल्याचा दावा केला,शिवाय अनेक मोठ्या कंपनीचे काम देखील मिहान मध्ये सुरू झाल्याचे दावा केला आहे...या दोन नेत्यांच्या जुगलबंदी मुळे या कार्यक्रमावर राजकीय रंग चढल्याचे बघायला मिळाले

बाईट- नितीन राऊत-ऊर्जामंत्री
बाईट- नितीन गडकरी- केंद्रीय मंत्री Body:.Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.